ब्युरोक्रसी

ब्युरोक्रसी

Submitted by चाऊ on 4 September, 2011 - 02:13

ब्युरोक्रसी, अशी कशी
वाकडी कामे, पटदिशी
सरळ माणसा पाडते फशी
कागदि घोडे, पुशी पुशी

काम झालं, नाही झालं
कामाच्या वेळी वामकुक्षी
बाबूच्या हातात, लेखणीला धार,
करते वार, तलवार जशी

आडून, नाडून, अडवले पाडून
कमवले, मिरवती, बेशरम! शी!
लेखणीचा धाक, कागदाचा बाक,
सगळेच खाक, आमच्या देशी

Subscribe to RSS - ब्युरोक्रसी