सुरुवात मी करतो ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑर्कुट मैत्रीनंतर प्रत्यक्ष भेटल्यावरही केमिस्ट्री जुळतेय हे लक्षात आल्यावर आम्ही जेव्हा लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा दोघांच्या जात आणि प्रांत भिन्न आहेत, तर त्यातून उद्भवणारया समस्यांशी आपल्याला लढायचे आहे आणि एकमेकांच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आहे हेच आम्हा दोघांच्या डोक्यात होते.
पण अशीच एक विसंगती आमच्या खाण्यापिण्याच्या आवडीतही होती, आणि तिथेही आम्हाला एकमेकाण्शी ॲडजस्ट करावे लागणार हे आम्हाला लवकरच समजले.
मला व्हेगन जीवन पद्धती बद्दल माहिती हवी आहे. भारतीय जीवन शैली तसेच आहार पद्धतीत हे कसे जमवावे ते अवगत करून घ्यायचे आहे. आपल्यापैकी कोणी आधीच ही जीवन पद्धती आचारत असल्यास आपले अनुभव लिहा. बरे वाइट काथ्याकूट करावा.
सर्व प्राणिजन्य उत्पादनांना आहारतून काढून टाकणे इतकीच मला माहिती आहे. तसेच चामड्याच्या वस्तू न वापरणे वगैरे. घरातले शेवटचे अंडे, तूप, चीज अमूल बटर दूधपावडर संपवून टाकत आहे. पण पुढे काय व कसे अंगिकारावे?
अधिक महत्वाचे म्हणजे आवश्यक ती पोषण मूल्ये कशी मिळवावीत? काही आजार असल्यास ही जीवन पद्धती सूटेबल नसते का इत्यादी आपले अनुभव मते लिहा.
खोबरं खवता यावं म्हणून
किसणी पात्री जपली जाते
मनी म्हावरं असलं तरी
घरी भाजी रांधली जाते
प्रभारी शाकाहारातलं शत्रूत्वं मात्रं
जिभेला प्रकर्षाने भासत असते
आणि अहंतामिश्रित सूनबाई मात्रं
किचनमध्ये धुसफूसत असते!
भडका.... किसणी बघून उमळून आलेला भडका...
(मीन्वा आज्जींना गुरुदक्षिणा म्हणून!
ता. क. - याकवियित्री छान आहे. एखादा शब्दं माझ्याबद्दलही लिहायला हवा होता. मी काय फक्तं याकचा फोटो पाठवला का?
माझ्यावर खर्चं केलेले फोटोतले पिक्सेल व्यर्थं गेले.)
नमस्कार मंडळी..
मायबोली वर सध्या "माझे शाकाहार पुराण " चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरू पाहत आहे.. प्रथम हेच सांगू इच्छितो कि ते माझे नाहीये .. त्याचे नाव माझे आहे.. जसे लहान पाणी आपण शाळेतल्या मुतारीत लिहायचो "वाचणारा वेडा.. किवा मी वेडा आहे "वगैरे वगैरे.. (अर्थात हे जरा जास्तच लहानपणी चे उदाहरण आहे कारण थोडे मोठे झाल्यावर मुले चित्रलिपीत जास्त प्रगत होतात आणि मोठी अचंबित करणारी भित्ती चित्रे रेखाटतात. असो.. हा आपला मुद्दा नाहीये हे आपले नशीब.)
तर लेखाचे नाव माझे...... असून ते माझे म्हणजे असे लिहिणार्याचे वैयाक्रिक मत आहे असा अर्थ आहे. नशिबाने हा सुद्धा आपल्या चर्चेचा विषय नाहीये..