मी पण अण्णा !!!!
मी पण अण्णा !!!!
राउळी वळकटी ,
न ठेला कनवटी,
मालमत्ता ताठ वाटी,
धरीतो सरकारास वेठी,
फकीर तो मराठी !!!
फकीर तो मराठी !!!!
महामेरू निश्चयाचा,
लढवय्या हिंद सेनेचा,
खंदा वीर सत्तरीचा,
कर्दनकाळ भ्रष्टाचाराचा,
पुत्र राळेगण चा !!!!
पुत्र राळेगण चा !!!!
भरितो हुंकार,
नेकीचा,
संकल्पाचा,
जागृतीचा,
कोटी कोटी क्रुद्ध मनांचा,
गगनभेधी नारा त्याचा,
वंदे मातरम !!!!
वंदे मातरम !!!!