गाजरा 'चं'

Submitted by योकु on 23 December, 2011 - 06:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ गाजरं (छान लाल पाहून घ्यावीत)
२ हिरव्या मिरच्या
२-४ चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट
एका लिंबाचा रस
तेल
मीठ
साखर
मोहरी
हिंग
हळद
हवं असेल तर थोडं लाल तिखट
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

गाजरं सोलून घ्यावीत. शेंडा बुडखा काढून किसावीत. मिरच्या धूवून तुकडे करावेत. कोथिंबीर बारीक चिरावी.

किसलेली गाजरं एका मोठ्या बाऊल मध्ये घ्यावीत. त्यात आता फक्त क्रमानी पदार्थ घालावेत, मिसळू नये- आधी मीठ, चवी साठी साखर, लिंबाचा रस, कोथिंबीर, घेतलं असेल तर लाल तिखट.

२ चमचे तेलाची फोडणी करावी-
त्यात मोहोरी, हिंग, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हळद घालावी. नंतर ही फोडणी गाजराच्या किसावर ओतावी. यात थोडं दाण्याचं कूट घालावं; सगळी कोशिंबीर सुकेल इतपत. बहुधा ३ चमचे वा जास्त लागेल. गाजरा 'चं' तयार आहे. भरपूर खावं!

वाढणी/प्रमाण: 
सलाड प्रकार असल्याने भरपूर
अधिक टिपा: 

डब्याकरता उत्तम कारण पाणी अजिबात सुटत नाही. गाजरं मात्र छान लाल हवीत. नाहीतर खालच्या फोटो सारखं दिसतं पण चवीत काही विशेष फरक नाही पडत!

माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपर लाईक!

हे ना चळचळीत गरम फोडणी त्या कुटावर घातली कि छान लागतं! थंड फोडणी ने वेगळी चव येते. मला गरम फोडणीची चव आवडते.

मी कढीपत्ता पण वापरला आणि चुरचुरीत फोडणी दिली... खूप छान लागतं, घरी सगळ्यांनी कौतूक केलं..

thank you Happy

ऑ? Biggrin