कदर ना जानी ना मोरा सैयाँ..
कित्येक दिवसातून पुन्हा थोडंफार बोलायला सुरूवात केलेली तिने. पण त्याचा अहं आज त्याला काही स्वस्थ बसू देईना. इतके दिवस तडफडतोय तिच्याशी बोलण्यासाठी. तिला खरंच कळत नाही का? बोलू तर शकतेच ना ती? जग बोलू शकतं तिच्याशी आणि फक्त मीच का नाही? की तो जास्त गुंतू नये तिच्यात म्हणून तिने बोलणं बंद केलंय? काही का असेना? सगळं जणू कळत असूनही तो भयानक चिडला तिच्यावर. अगदी सगळं काही तुटेपर्यंत. तिने नेहेमीप्रमाणेच पडतं घेतलं. अवाक्षर ही न काढता त्याला मनमुराद भांडू दिलं. सगळं काही ओकून झाल्यावर तो ही थोडासा शांत झाला.