असह्य

असह्य..

Submitted by निवडुंग on 18 May, 2011 - 12:42

तुझ्या आठवणींच्या कारावासात,
तळमळतोय प्रत्येक क्षण.

तो बरसलेला श्रावण,
तुझं खळाळतं हसू,
ओझरतं अलवार चुंबन,
अन् एकजीव झालेले श्वास.

तुझ्या श्‍यामल तनूचा,
मोहक वेडावणारा गंध,
अल्लड बटेतून विरघळलेले दोन थेंब,
अन् काळजाचं झालेलं पाणी पाणी.

माझ्या विरहाच्या चाहूलीने,
तुझे कोसळलेले बांध,
खोलवर कातरलेलं हृदय,
अन् ओठावरचं खोटंच हसू.

कठोर होत सोडवलेली,
तुझी अथांग मिठी,
अन् जपून ठेवलेली बुचाची फुलं,
तुझ्या आठवणीत आजही.

सगळं सगळं परत घेऊन जा.
सगळंच,
आणि जमलं तर देऊन जा देणगी,
स्मृतीभ्रंशाची.

असह्य झालंय गं खरंच आता,
फार असह्य,
अन् तुझ्या आठवणीच्या कारावासात,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - असह्य