कुणाला काय त्याचं?
Submitted by निवडुंग on 8 May, 2011 - 15:43
काल अवसच्या रातंला,
पाल भयाण चुकचुकली,
शकून होता का अपशकुन?
कुणाला काय त्याचं?
कुत्र्याच्या इमानदारीने,
लोंडा घोळत लाळ घोटली,
हाड हाडच झाली ना जीवाची?
कुणाला काय त्याचं?
मदिरेच्या धुंद प्याल्यात,
तुझीच प्रतिमा थरथरली,
अतॄप्त तहान वाहवली.
कुणाला काय त्याचं?
सिगरेटच्या धुम्रवलयात,
धुसरलं पोळलेलं हृदय अन् शरीर,
रात गाढ बिनधास्त सुखावली.
कुणाला काय त्याचं?
नीरव डांबरी रस्त्याची शांतता,
माझ्या रक्ताने शहारली,
बघ्यांचा क्षणिक चिवचिवाट,
मेला का जगला?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा