आयुष्य कसं असावं?
Submitted by निवडुंग on 11 May, 2011 - 13:18
आयुष्य कसं असावं?
सिगरेट सारखं..
त्याच्या दु:खात,
स्वता:ला पेटवलेलं.
त्याच्या औट घटकेच्या सुखासाठी,
स्वत्व जाळलेलं.
त्याचे ओठ चुंबून,
स्थळकाळ भुलवणारं.
संपत आलं जरी,
त्याला समजावून चुटपुटणारं.
शेवट पायदळी तुडवलं जाणार हे जाणूनही,
त्याचं दु:ख आपलसं करणारं.
आयुष्य कसं असावं?
सिगरेट सारखं.
स्वत: राख होत,
क्षणिक का होईना,
त्याच्या संपूर्ण रोमारोमात भिनलेलं.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा