Submitted by निवडुंग on 24 May, 2011 - 12:20
खोलीभर व्यापलेल्या उदासीनतेत,
विस्कटलेल्या शरीरातील धमन्यांतून,
ठिपकत राहतं रक्त,
अव्याहत टिक टिक करत.
कवटीच्या जोडणार्या सांध्यावर,
अचूक हातोडा घातला की,
अलगद डोकावतो मेंदू बाहेर.
त्यात साठलेल्या कडूगोड आठवणी,
कातरून विलग करून,
पसरवून देतो सार्या जमिनीवर.
डोळ्यातील बुब्बुळं एकवटून,
कितीही लक्ष केंद्रित केलं,
तरी कशाचाच काही अर्थ लागत नाही,
डोळ्यातून पाणी पाझरेपर्यंत.
मग त्या एका एका तुकड्यावरून,
हात फिरवत सारवून घेतो सगळी जमीन,
अगदी लालभडक होईपर्यंत.
आठवणींचे तुकडे कधीच विरून जातात,
अन हातावर उरतं फक्त साकळलेलं रक्त.
त्याच्याकडे पाहत राहतात मग बुब्बुळं,
निर्विकारपणे.
तोच हात तोंडावरून खसाखसा फिरवत,
चेहरा रंगवून घेतो,
पूर्ण लालेलाल होईपर्यंत.
काहीतरी निसटल्याची जाणीव,
कुणीतरी हरवल्याची जाणीव,
होत असते पुसटशी.
पण,
कशाचाच काही अर्थ लागत नाही.
गुलमोहर:
शेअर करा
शवागारात सुचली कि काय कविता
शवागारात सुचली कि काय कविता ..?
सहीयै
किरण्यके.. शवागारात नाही
किरण्यके..
शवागारात नाही सुचली, अजून जायचंय तिकडे.. आणि तिथे गेल्यावर कविता सुचणार नाही बहुतेक..
आभार !!
ब्बुब्बुळाच्या पुढे कविता
ब्बुब्बुळाच्या पुढे कविता वाचवली नाही गेली
कित्ती दु:ख मांड्तोस रे...
सरसरुन काटा येतो बाई वाचताना.....
ह्म्म्म्म.. बागेश्री..
ह्म्म्म्म.. बागेश्री..
बहुतेक कविता दोन भागात पोस्ट करायला पाहिजे होती..
एकदम निवडूंगी कविता !!
एकदम निवडूंगी कविता !!
काका.. आभार !
काका..
आभार !
GOD!!! EXTREME one!!
GOD!!! EXTREME one!!
आनंदयात्री..
आनंदयात्री..
ह्म्म.. प्रभावी.. नकोशा पण
ह्म्म.. प्रभावी.. नकोशा पण प्रचंड शक्तीशाली चुंबकासारखी..!
मुक्ताजी, आपल्या
मुक्ताजी,
आपल्या प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे.
ह्म्म्म्म...बात है...!
ह्म्म्म्म...बात है...! मुक्ताशी सहमत !
गिरीशजी.. खूप आभार !
गिरीशजी..
खूप आभार !