कातडी
Submitted by निवडुंग on 27 April, 2011 - 12:19
कातडीचाच चाललाय खेळ सारा,
अदिपासून अंतापर्यंत.
देवापासून दानवापर्यंत
आणि क्षुद्र मानवापर्यंत.
काळी, गोरी,
सावळी, गव्हाळी,
देखणी, लुसलुशीत
गुबगुबीत, रसरशीत,
बिलबिलीत, फिदफिदित
तलम, मऊसूत
तजेलदार,
सुरकुतलेली, जर्जरलेली,
जाळीदार.
विविधरंगी, विविधढंगी..
कातडीच्या मायाजाळातच गुरफटायचा
भोगाचा कपट इशारा.
विश्वामित्रालाही मेनकेच्या
कातडीचा नजारा.
ह्या कातडीचा माजच लई न्यारा,
म्हणून
वेश्यानो -
कातडीवर लिपापोती करा,
फाये लावा,
साज चढवा, नखशिखांत नटवा,
तिच्यावर तोकडे कपडे लटकवा,
जे झाकायचं तेच दाखवा
उरलेलं मात्र झाकून ठेवा.
बळीचा बकरा बनवा.
मग तिलाच बाजारात विका,
गुलमोहर:
शेअर करा