थांबलो आहे खरा पण घेतली माघार नाही
वाकलो आहे जरासा जाहलो लाचार नाही
काय सांगू, बोलताना तोल जातोही अताशा
आणि मौनाचा कधी मी घेतला आधार नाही
काय प्रश्नाचीच येथे चालते बेबंद सत्ता?
उत्तरे मिरवील ऐसा एकही दरबार नाही?
बुजलेल्या वाटांचा काही गाव शोधणे नाही
दूर निळ्या मेघांची आता वाट पाहणे नाही
आसुसलेली हुरहुरणारी रात जागणे नाही
अता व्यथा माझी मजपाशी मौन तोडणे नाही
कसे पटावे जनरितीला नाते तुझे नी माझे
कुणास सांगू गीता कृष्णा सुचतच नाही
अर्जुन कोणी लायक येथे दिसतच नाही
कसा पुरावा लपवावा अपुल्या भेटीचा?
श्वासातिल प्रणयाचे अत्तर उडतच नाही
या दोघांची गाठ कुणी अन कशी बांधली?
मनामागुनी शरीर दुबळे, पळतच नाही!
चादर नाही, छप्पर डोक्यावर नाही
या रस्त्यांवर स्वप्नांचा वावर नाही
काल नफ्याने भिजले जे; या तोट्याचा -
शिंतोडाही त्यांच्या अंगावर नाही?
मंदी, युद्ध...तुम्हाला विषय चघळण्याचे
पोट तुम्हा लोकांचे हातावर नाही
जरी तोडण्याचा मुळी डाव नाही
तरी सांधण्याचा अविर्भाव नाही
कसा वागण्याचा अता तोल ठेवू
न मी चोर मी राहिलो साव नाही
उभ्या वादळांनी निमाले किनारे
अजूनी बुडाली जरी नाव नाही
खुणा मी दुजांच्या जपूनी मिरवल्या
जुनेच रस्ते दिशा जुन्या हा नवीन कुठला प्रवास नाही
उगीच वळणे हवीनकोशी अजून कुठलाच ध्यास नाही
खरेच का मी मनापासुनी करीत नव्हतो तुझी प्रतीक्षा?
तुला पाहता समोर, गेला कुडीस सोडून श्वास नाही!
कुठून आला ठराव की दर्वळलोसुध्दा नाही?
अरे इथे तर अजून मी सळसळलोसुध्दा नाही!
उगा भिडवली नजर जगाच्या अथांग डोळ्यांशी मी
असा हरवलो पुन्हा मला आढळलोसुध्दा नाही
मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
गूढ तव डोळ्यात केंव्हा, चांदणे हसलेच नाही
तू तमाला झेलले, नाही कधी म्हटलेच नाही
केवढी तलखी उन्हाची, सावली झालीस माझी
पोळ्ले तव पाय तरिही, मागुती वळलेच नाही
संधिकाली शांतवेळी, दाटले डोळ्यात पाणी