प्रवेशिका - २६ ( shyamali - थांबलो आहे खरा... )

Submitted by kaaryashaaLaa on 8 October, 2008 - 00:04

थांबलो आहे खरा पण घेतली माघार नाही
वाकलो आहे जरासा जाहलो लाचार नाही

काय सांगू, बोलताना तोल जातोही अताशा
आणि मौनाचा कधी मी घेतला आधार नाही

काय प्रश्नाचीच येथे चालते बेबंद सत्ता?
उत्तरे मिरवील ऐसा एकही दरबार नाही?

बास आता फार झाले, वाट बघणे जीवनाची
मांडली माझी कथा मी, नोंदली तक्रार नाही

टेकवूनी लाख डोकी, पाय झाले जीर्ण पुरते;
आणि म्हणती, "सावळ्याला भावनेचा भार नाही!"

नित्यनेमे रोज दारी पालखी ये आठवांची
प्रेमभावे वंदितो मी, सोडला व्यवहार नाही

वादळाला सवय झाली सोबतीने चालण्याची
ते मुळी सोशीक आणिक; त्रास माझा फार नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! शेवटचा शेर आरपार!
माझे ८
-----------------------------------------------------
फिर मुझे दीद-ए तर याद आया
दिल, जिगर तश्न-ए फरियाद आया

७ गुण.

मस्त!
वादळ आणि मौन शेर फार आवडले! तक्रार शेरातही अनेक शक्यता आहेत...
माझे गुण - ७.

व्वाह! खासच!
शेवटचा शेर एक नंबर... आरपार अगदी. मौनही छानच!
गजल अगदी जमून गेलीये.

मला वादळचा शेर आवडला.. बाकीचेही छान आहेत. माझे ५ गुण.

मतला छान! मौनाचा शेर खूपच सुंदर.
पालखीचा शेरही आवडला. 'सावळ्याला...' तितकासा रेखीव नाही वाटला. शेवटचा ही चांगला आहे.
माझ्या मते ७ गुण.
-सतीश

वाह! संपूर्ण गझल सुंदर!
९ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

व्वा! माझे ८ गुण. अख्खी गजल आवडली

एक न् एक शेर मस्त जमलाय..

टेकवूनी लाख डोकी, पाय झाले जीर्ण पुरते;
आणि म्हणती, "सावळ्याला भावनेचा भार नाही!"

अहाहा......... ९ गुण

काय प्रश्नाचीच येथे चालते बेबंद सत्ता?
उत्तरे मिरवील ऐसा एकही दरबार नाही?

खुपच छान !!!!

१० पैकी १०...

वा...
मतला...प्रश्न...आणि वादळ आवडले

टेकवूनी लाख डोकी, पाय झाले जीर्ण पुरते;
आणि म्हणती, "सावळ्याला भावनेचा भार नाही!"
आवडला...
माझे ५
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

आवडली.. ८ गुण.
- अनिलभाई

गझल सही आहे...
थांबलो आहे खरा पण घेतली माघार नाही
वाकलो आहे जरासा जाहलो लाचार नाही... वा

'बोलताना तोल जातो' हा शेर असा करावा वाटला..

बोलताना तोल जातो; जाऊ दे, पर्वा न मजला
मात्र मौनाचा कधीही आसरा घेणार नाही

काय प्रश्नाचीच येथे चालते बेबंद सत्ता?
उत्तरे मिरवील ऐसा एकही दरबार नाही?...
वादळाला सवय झाली सोबतीने चालण्याची
ते मुळी सोशीक आणिक; त्रास माझा फार नाही.... हाय क्लास शेर..

-मानस६

वा वा! मक्ता फार आवडला.

वाह.. ! मतला मक्ता सुंदर..
जास्त complicated न करता आशयला धरून आलेत सगळ शेर

८ गूण..

मस्तच.

बास आता फार झाले, वाट बघणे जीवनाची
मांडली माझी कथा मी, नोंदली तक्रार नाही

>>> हा शेर शेवटी आला असता तर अजुन चांगला परीणाम साधला गेला असता का? का मलाच वाटतंय असं फक्त? मी थोडासा गझल वाचनाच्या द्रुष्टीने विचार केला.

असो. संपुर्ण गझलच अप्रतिम आहे.

गुणः ९

वाह! बहोत खूब!
वादळही सोशिक व्हावे अशी जिगर! मस्त सर्व शेर.
माझे ९

'वादळाला सवय झाली सोबतीने चालण्याची
ते मुळी सोशीक आणिक; त्रास माझा फार नाही'
फार सुन्दर गझल आहे.
माझे १० गुण!

व्वा!!! सर्वच शेर आवडले...माझे ८ गुण

वा!! फारच सु॑दर!!!
काय प्रश्नना॑ची येथे बेब॑द चालते सत्ता?
उत्तरे मिरविल असा एक ही दरबार नाही
सु॑दर!!! माझे १० गुण

सुंदर !! सर्वच शेर आवडले ...
माझे ९ गुण

उत्तम गझल
माझे १०

आपणासर्वांच्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद जनहो Happy

Pages