प्रवेशिका - २२ ( zelam - जरी तोडण्याचा मुळी डाव नाही...)

Submitted by kaaryashaaLaa on 6 October, 2008 - 22:41


जरी तोडण्याचा मुळी डाव नाही
तरी सांधण्याचा अविर्भाव नाही

कसा वागण्याचा अता तोल ठेवू
न मी चोर मी राहिलो साव नाही

उभ्या वादळांनी निमाले किनारे
अजूनी बुडाली जरी नाव नाही

खुणा मी दुजांच्या जपूनी मिरवल्या
स्वतःचा कळेना कसा ठाव नाही

सुन्या मौनपंक्तीच मी छेडिलेल्या
कुठे मैफिलीचा वृथा आव नाही

कधी कौतुकाची नशा पांघरावी
जरी सोहळ्यांची मला हाव नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>उभ्या वादळांनी निमाले किनारे
अजूनी बुडाली जरी नाव नाही

सही! ७ गुण.

आवडली.
ह्या र्‍हस्व-दीर्घाच्या सुटी (सूट चं हेच का अनेकवचन) का मीच चूकतेय?
अजूनी, जपूनी...
माझे ६
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

काही खास नाही वाटली कारण प्रत्येक शेर जवळपास एकसारखाच वाटतो. पण प्रयत्न केला त्याबद्दल खूप खूप कौतूक.
६ गुण.

मला तरी वाटत... अजून, जपून बरोबर आहे..

कल्पना छान आहेत. काही शब्दांमध्ये सूट घेतली आहे ती प्रयत्न करून टाळता आली असती असे वाटले. मला 'दुजांच्या खुणा..' चा शेर खास आवडला..
माझे ५ गुण.

"कधी कौतुकाची नशा पांघरावी
जरी सोहळ्यांची मला हाव नाही"
छान!!!

७ गुण...

दुसरा शेर विशेष आवडला. 'न मी चोर मी राहिलो साव नाही' ही कल्पना खूपच छान!
माझ्या मते ६ गुण.
-सतीश

खुणा मी दुजांच्या जपूनी मिरवल्या
स्वतःचा कळेना कसा ठाव नाही
>> आवडला. ५ गुण

--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

मला लय आवडली आणि शैली आवडली. ८ गुण.

चोर-साव छान!
बाकी ठीक वाटले.
माझे गुण - ५.

उभ्या वादळांनी निमाले किनारे
अजूनी बुडाली जरी नाव नाही

मस्त आहे.. माझे ४ गुण..

माझे गुण ४
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

मस्त, आवडली सगळीच

वृत्त छान जमले आहे. र्‍हस्व दीर्घ सवलती घेतल्या आहेत.
गझल छान आहे. ६ गुण

---------------------------
आपसे मिलके हमें रोना था, बहोत रोना था
तंग्-ए-वक्तने मुलाकातमें रोने न दिया

इश्कमें गैरते जजबातने रोने न दिया

सुन्या मौनपंक्तीच मी छेडिलेल्या
कुठे मैफिलीचा वृथा आव नाही

छान.

गुणः ६

छानच
शेवट्च्ञा ओळीत जरी च्या ऐवजी अशा हा शब्द मला छान वाट्तो .
माझे ६