क्रोशा
क्रोशा फ्रॉक आणि मफ्लर.
क्रोशा कलाकृती
शांकलीची गुरुदक्षिणा
शांकली, एक अतिशय शांत; लाईमलाईट मध्ये अजिबात येऊ नये असा प्रयत्न करणारी; आणि माझी एक लाडकी विद्यार्थिनी
घर, मुलं, नवरा, बाग, मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पा, नोकरीतील जबाबदा-या व अडचणी, इतर विवंचना या सगळ्यांवर मात करून गेल्या काही महिन्यात शांकलीने क्रोशा विणकामात फारच छान प्रगती केलीय. तिने विणलेले अनेक फ्रॉक्स याची साक्ष देतात. तिच्या स्वभावानुसार त्यातले थोडेच विणकाम तिने इथे शेअर केले; पण त्यावरूनही अंदाज यावा.
आज मात्र मीच तिने केलेले विणकाम टाकतेय . कारण ही तिने मला दिलेली गुरुदक्षिणा आहे.
रुमाल व तोरण
एक नवा प्रयोग : जाकिट
प्रिया७ ने इथे एका मॉल मधल्या जाकिटाचा फोटो पाठवला होता. तो करायचा प्रयत्न केला. मॉल मधले जाकिट दो-याचे होते. आपल्याकडे फाईन दोरा मिळत नसल्याने मी लोकरीचे केले. अनायसा बहिणीचा वाढदिवस असल्याने तिला देता येईल, प्रिया खूप खूप धन्यवाद ग
हा तिने पाठवलेला फोटो
आणि हा माझा प्रयत्न ( सध्या मॉडेल नसल्याने उशीला चढवलाय, त्यामुळे शेप जरा नीट दिसत नाहीये )
वेगळीच फुललेली फुलं
ओटी
अननसाचा व्हि नेक/ बोट नेक पोंचू
वंदनाने, माझ्या ऑन लाईन विद्यार्थिनीने छान विणकाम केले. आणि मग तिने www.anniescatalog.com या साईट वरचा हा फोटो दाखवला
आणि विचारले असे करता येईल का? आता तिला काहीतरी बक्षिस तर द्यायचं होतं. मग म्हटलं चला, हा पॅटर्न जमतोय का बघूयात आणि हा पॅटर्नच तिला बक्षिस देऊयात
नेट वर असलेले डिझाईन खूपच फिके आणि ब्लर होते.