मला पहिल्यापासून विणकाम, भरतकाम करायला खूप आवडत. लहान असताना मण्याची तोरणे नाहीतर लहान लहान भरतकाम करत राहायचे. आता काम आणि संसार सांभाळताना वेळ कमी मिळतो. पण ‘आवड असली की सवड मिळते’ म्हणतात, तशी सवड काढून काहीतरी उद्योग चालू ठेवते. लेकाचा अभ्यास घेताना नाहीतर टी.व्ही. बघताना हात चालू असतो. नवऱ्यानेही आता निषेध नोंदवणे सोडून दिलय!!
माझ्या आईची माहीती पूर्वी मी इथे लिहिली होती. त्यात तिच्या काही कलाकृतींचे फोटोही टाकले होते. तिने केलेल्या बटव्याचा फोटो आज टाकतेय.
माझा आधीचा स्वेटर पाहून मला मिळालेली ही पहीली ऑर्डर.
खूप जणींनी वीण आणि स्वेटर कसा करायचा ते लिहायला सांगीतलंय ते मी लिहीणारे पण वेळेची मारामारी आहे. वेळ झाला की लिहीन. हे मी इकडे लिहीलंय. http://www.maayboli.com/node/19914
स्वेटर घालून रमा:
टोपी वरच्या चित्रात जी दाखवली होती ती जरा लहान होत होती. मग ती जरा उसवून मोठी टोपी केली तेव्हा पॅटर्न थोडा बदलला आणि मिनोतीने सांगीतलेलं करेक्शन पण केलं. टोपी आणि स्वेटर घालून रमा.
माझी नवी कलाकारी. (स्वेटरच्या खाली आहे ती कांथा वर्क असलेली ओढणी - (मी केलेली नाही - विकतची :P))
टोपी केली या स्वेटरवरची आणि छोटे शूज करायचा बेत आहे. एका ठीकाणी रहावं म्हणून टोपी इथेच टाकतेय.
शूज
एकत्र असं दिसतंय.