गणेशोत्सव संयोजक मंडळाची घोषणा झाली आणि एक वेगळंच वातावरण तयार झालं. यावर्षीच्या संयोजक मंडळातील सदस्यांनी याआधी गणेशोत्सवात कधीच काम केलेलं नसल्याने सगळ्यांमध्येच एक वेगळाच जोश होता. स्पर्धा-कार्यक्रम ठरवण्याचा उत्साह, नवनवीन कल्पना, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठीची धडपड, गणेशोत्सव दरवर्षीइतकाच उठावदार तरीही नाविन्यपूर्ण व्हावा यासाठीची खटपट आणि या सगळ्याबरोबर अपरिहार्यपणे येणारी, सगळं नीट पार पडेल ना ही धाकधुक या सगळ्याचीच आज सांगता होत आहे. हा गणेशोत्सव यशस्वी करण्यामागे अनेकांचे योगदान आहे, त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम गणेशोत्सव संपल्यावर होत असला तरी अत्यंत महत्वाचा.
गणेशोत्सवातील जाहिरातींची प्रथा यावेळच्या संयोजक मंडळानेही सुरु ठेवली. यावर्षीच्या जाहिरातीही मायबोलीकरांना आवडल्या, कल्पक वाटल्या असे बर्याच जणांनी सांगितले. या सगळ्याच जाहिराती एकत्र बघायला मिळाव्यात यासाठीच हे जाहिरातींचे दालन ...
![Ad_HG_Ganesh_2010.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/Ad_HG_Ganesh_2010.gif)
![aikaGaneshDevaNew.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/aikaGaneshDevaNew.jpg)
![Amntran.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/Amntran.jpg)
संगितकार - श्री. म. ना. कुलकर्णी
गीतकार - सौ. आश्लेषा महाजन
कलाकार - मो
ॐकार प्रधान रूप गणेशाचे
हे तीन्ही देवांचे जन्म स्थान ||
![2010_MB_Ganesha2_small_rspac.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/2010_MB_Ganesha2_small_rspac.jpg)
अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णु
मकार महेश जाणियेला ||
ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ||
तुका म्हणे ऐसी आहे वेद वाणी
पहावी पुराणी व्यासाचिया ||
गायिका - मो
काराओके स्त्रोत - इंटरनेट
मूळ गायिका: सुमन कल्याणपुर
मूळ संगीतकार: कमलाकर भागवत
गीतकार: संत तुकाराम
मुलांनो, आता आपण ऐकूया गणपती बाप्पाची एक गोष्ट.
कलाकार - हेमांगी वाडेकर
![2010_MB_Ganesha2_small_rspac.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/2010_MB_Ganesha2_small_rspac.jpg)
महागणपती वरद विनायक
मंगलमूर्ती मंगलदायक -धॄ-
तुझ्या चरणीच्या गोड पैंजणी
घुंगरु झाल्या रागरागिणी
तुजसी शरण मी साधक गायक -१-
नादब्रह्म तू, तू सुखदाता
स्वरतालांचा आश्रयदाता
वर सॄजनाचा दे गणनायक -२-
![2010_MB_GaneshaForK_small.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/2010_MB_GaneshaForK_small.jpg)
साहेबाची भाषा कशी आहे पहा-
"Hi, I am John Abraham, you can call me John.."
"Yes John, sure..."
आता मराठी पाहूया-
"नमस्कार, मी जनार्दन अगरवाल.. मला जनार्दन म्हटलंत तरी चालेल.."
"बरं बरं, तर जनार्दनराव.."