ॐकार प्रधान रूप गणेशाचे - मो

Submitted by संयोजक on 31 August, 2010 - 01:14

ॐकार प्रधान रूप गणेशाचे
हे तीन्ही देवांचे जन्म स्थान ||

2010_MB_Ganesha2_small_rspac.jpg

अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णु
मकार महेश जाणियेला ||

ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ||

तुका म्हणे ऐसी आहे वेद वाणी
पहावी पुराणी व्यासाचिया ||

गायिका - मो
काराओके स्त्रोत - इंटरनेट

मूळ गायिका: सुमन कल्याणपुर
मूळ संगीतकार: कमलाकर भागवत
गीतकार: संत तुकाराम


Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

मो, मस्तच गं!!!
खुप छान वाटलं ऐकुन!

(मी पण तुझ्याबरोबर दोन वेळा गाऊन घेतलं. शेवटी कन्या म्हणाली , 'आता मला ते लॅपटॉप मधलं ऐकु दे बरं' Biggrin )

मो, काय गोड आवाज आहे ग तुझा आणि शब्द किती स्पष्ट म्हटले आहेस. एकदम आवडलं. मजा आली सकाळीच ऐकायला.

वाह....क्या बात है....... कसला सुरेख आवाज आहे तुझा मो........!!
अप्रतिम झालंय गाणं !!
अजून ऐकायला आवडतील गाणी तुझ्या आवाजात Happy
खूप प्रसन्न वाटलं Happy

Pages