जरी चाललासी गृहासी पुन्हा या
कृपादृष्टी ती राहू दे शांतवाया
असे नेणता पूजनी अर्चनीया
तरी गोड मानूनी घ्या मोरया बा
न जाणेचि पूजादिका भाव काही
परी बाळकाचि मती ध्यानी घेई
कृपाळूपणे सर्व सांभाळी आता
पुन्हा मागुते येत र्हावे समर्था
तुवा निर्मियेले फले पुष्प वस्त्रे
समर्पोनी मागे जरी मोती रत्ने
तरी जाणुनी भाव हा नष्ट सारा
सुबुद्धी परी देत राही उदारा
जरी मूढता व्यापूनिया मनाला
परी ओढ थोडी असे मन्मनाला
जरा प्रेम देई उदारा कृपाळा
तरी दूर हो ऐहिकाचा जिव्हाळा
मित्रांनो... आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी नवीन गाणं रेलीज केलं आहे. जरूर ऐका, विसर्जनापर्यन्त रोज वाजवा आणि शेअर करा.....
https://youtu.be/_hfF0zfQ8nM
धन्यावाद...
प्रवरा संदीप.
बाप्पा मोरया रे !!
गणपती बाप्पा आले कि घरी
सारे वातावरण होते एकदम सही
बाप्पा बसण्या आधीपासूनच
मोदक खायची आमची घही
बाप्पांच्या पूजेचा प्रसाद तेवढा
फक्कड हवा एवढे तुम्ही जाणा
जमत नसेल किंवा आळस असेल तर
सरळ "चितळ्या" न कडून आणा [सणासुदीत पण दुपारी १ ते ४ बंद ]
बाप्पांच्या आरतीला देतो प्रत्येक जण
मस्त टाळ्या न चा सुरेल कोरस
आरतीचे ताम्हण जरी हातात नसले
तरी घंटी वाजवायला आमची चुरस
बाप्पांची भक्ती करण्याचा
सार्वजनिक मंडळांचा असतो वेगळाच थाट
सकाळीच तेवढी लता बायींची रेकॉर्ड
अन दिवसभर हिमेश ची गाणी भन्नाट