बाप्पा मोरया रे !!
गणपती बाप्पा आले कि घरी
सारे वातावरण होते एकदम सही
बाप्पा बसण्या आधीपासूनच
मोदक खायची आमची घही
बाप्पांच्या पूजेचा प्रसाद तेवढा
फक्कड हवा एवढे तुम्ही जाणा
जमत नसेल किंवा आळस असेल तर
सरळ "चितळ्या" न कडून आणा [सणासुदीत पण दुपारी १ ते ४ बंद ]
बाप्पांच्या आरतीला देतो प्रत्येक जण
मस्त टाळ्या न चा सुरेल कोरस
आरतीचे ताम्हण जरी हातात नसले
तरी घंटी वाजवायला आमची चुरस
बाप्पांची भक्ती करण्याचा
सार्वजनिक मंडळांचा असतो वेगळाच थाट
सकाळीच तेवढी लता बायींची रेकॉर्ड
अन दिवसभर हिमेश ची गाणी भन्नाट
वीकेंड च्या रात्री गावातले गणपती
बघायची असते वेगळीच मज्जा
चालून चालून कंटाळा आला कि
करायच्या ओर्डेर एक "कटिंग" अन भज्या
करायला आपल्या इच्चा पूर्ण
बाप्पा येतात घरी फक्त १० च दिवस
म्हणून मागण्या करते कुणी "होल सेल " मध्ये
तर करते कुणी discount मध्ये नवस
देशा पासून दूर असले म्हणजे
ही सारी मज्जा बघताच येत नई राव
सण नई नि वार नई
वेड्या सारखे नुसते पैश्या मागे धाव
पण ती कमी पुरी करायला
तुम्ही मायबोलीकर आहात सारे
गणेश उस्तवाच्या तुम्हास शुभेच्या
बोला "बाप्पा मोरया रे !"
जग्या
११/९/२०१०