विरागा

जरी चाललासी गृृृृृृहासी पुन्हा या

Submitted by पुरंदरे शशांक on 1 September, 2020 - 05:07

जरी चाललासी गृहासी पुन्हा या
कृपादृष्टी ती राहू दे शांतवाया
असे नेणता पूजनी अर्चनीया
तरी गोड मानूनी घ्या मोरया बा

न जाणेचि पूजादिका भाव काही
परी बाळकाचि मती ध्यानी घेई
कृपाळूपणे सर्व सांभाळी आता
पुन्हा मागुते येत र्‍हावे समर्था

तुवा निर्मियेले फले पुष्प वस्त्रे
समर्पोनी मागे जरी मोती रत्ने
तरी जाणुनी भाव हा नष्ट सारा
सुबुद्धी परी देत राही उदारा

जरी मूढता व्यापूनिया मनाला
परी ओढ थोडी असे मन्मनाला
जरा प्रेम देई उदारा कृपाळा
तरी दूर हो ऐहिकाचा जिव्हाळा

Subscribe to RSS - विरागा