कन्ना
कुसुमाग्रजांची माफी मागून, विडंबन सादर करतो आहे "कन्ना"
ओळखलंत का काका मला,
संक्रातीत आला कुणी,
कपडे होते बरबटलेले
खिशात चिल्लर नाणी..
क्षणभर बसला, नंतर उठला
बोलला वरती पाहून,
"पतंग पडली गच्चीत तुमच्या, घेऊ का वरती जाऊन?"
तमाशातल्या पोरीसारखी चार पतंगात नाचली
मांजा पूर्ण जाईल कसा, चरखी मात्र वाचली
पतंग कटली, गच्चीत पडली
मांजाही थोडा गेला..
प्रसाद म्हणून हातामध्ये गुंता तेवढा ठेवला
तुमच्या घरी येऊन काका,
व्यथा माझी सांगतो आहे..
जरा विनंती करतो आहे
पतंग फाटकी मागतो आहे..
चावीकडे हात जाताच, धीर जरा वाटला
पतंग मिळेल आता म्हणून हर्ष मनी दाटला..