Submitted by अमोल केळकर on 15 July, 2011 - 04:43
कवी कुसुमाग्रजांच्या ' कणा ' या कवितेचे वेगळे रुपांतर
------------------------------------------
ओळखलस का देवा मला?'- स्वर्गात आला कोणी
शरीर होते सोडलेले, आत्म्याचीच वाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
पृथ्वीवरुन आत्ताच आलो. आलो स्फोटात मरुन;
रविवारच्या सुट्टीमध्ये बाजाराला गेलो
स्त्यावरच्या स्फोटाने धाडकन मेलो
नेते आले, पैसे दिले, सांत्वन थोडे केले,
सरणावर जळूनी जाता विसरुन सारे गेले.
कारभारणीला सोडून देवा इथे आता आलो आहे;
संपलेल्या स्वप्नांचा विचार सतत करतो आहे.
देवीकडे वळून पाहताच हसत हसत उठला
‘वर नको देवा, जरा एकटेपणा वाटला.
संपून गेले जीवन तरी सुटली नाही आशा
पाठीवरती हात ठेउन, फक्त शांती म्हणा’!
------------------------------------------
अमोल केळकर
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
भारीच.
भारीच.