कन्ना

Submitted by मी विडंबनकार on 4 December, 2013 - 03:00

कुसुमाग्रजांची माफी मागून, विडंबन सादर करतो आहे "कन्ना"

ओळखलंत का काका मला,
संक्रातीत आला कुणी,
कपडे होते बरबटलेले
खिशात चिल्लर नाणी..

क्षणभर बसला, नंतर उठला
बोलला वरती पाहून,
"पतंग पडली गच्चीत तुमच्या, घेऊ का वरती जाऊन?"

तमाशातल्या पोरीसारखी चार पतंगात नाचली
मांजा पूर्ण जाईल कसा, चरखी मात्र वाचली

पतंग कटली, गच्चीत पडली
मांजाही थोडा गेला..
प्रसाद म्हणून हातामध्ये गुंता तेवढा ठेवला

तुमच्या घरी येऊन काका,
व्यथा माझी सांगतो आहे..
जरा विनंती करतो आहे
पतंग फाटकी मागतो आहे..

चावीकडे हात जाताच, धीर जरा वाटला
पतंग मिळेल आता म्हणून हर्ष मनी दाटला..

फाटली आहे पतंग तरी, तुटला नाही कन्ना
पाठीवरती हात ठेऊन परत उडव म्हन्ना!!

-विडंबनकार

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फाटली आहे पतंग तरी, तुटला नाही कन्ना
पाठीवरती हात ठेऊन परत उडव म्हन्ना!!

हाहाहा. मस्त जमलंय.

लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

मस्त. आवडलं विडंबन.
पतंगी चे दीवस आठवले. आमच्या इकडे अकोल्याला कन्ना म्हणजे पतंगीचा बॅलन्स नीट रहावा म्हणुन पतंगिच्या काडीला मांजा बांधयचा तो. तुम्ही पण त्याच अर्थी वापरला ना?