मनाली
अविश्वसनीय लडाख ! .... भाग ४
अविश्वसनीय लडाख ! .... भाग ३
अविश्वसनीय लडाख ! .... भाग २
अविश्वसनीय लडाख !
मंगलमूर्ती मोरया !
जूले …… !
कोणे एके काळी....
जेंव्हा केंव्हा भूगोल ह्या विषयात नकाशे येणे सुरू झाले, तेंव्हापासून तो माझा जास्तच आवडता विषय झाला. मला वाटत सहावी सातवीमधे असेल. पहिल्यांदा भारताचा नकाशा पाहीला तेंव्हा दोन नावांनी माझ लक्ष वेधून घेतल होत. एक लेह आणि दुसर गिलगिट. तेंव्हा या दोन जागांना कधितरी भेट द्यायची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. ती २, ३ वर्ष टिकली. नंतर ते मनातून निघून गेल. त्यानंतर दोन वेळा हिमालयात जाऊन आलो. पण लेहची काही आठवण झाली नाही.
निद्रेविण स्वप्नांच्या ओळी - हिमालयातली एक रात्र
रात्री नऊ वाजता बस सुटली आणि मी सुटकेचा मोठा नि:श्वास टाकला. 'जय भवानी', 'जय शिवाजी' च्या जयघोषात कुणाला तो ऐकू गेला नसावा, पण वेळच तशी होती. ह्या बसवर आणि त्यापेक्षाही त्या बसच्या उतारूंवर गेल्या काही दिवसांत इतके प्रसंग ओढवले होते (कुणी खोडसाळ म्हणेल की 'ओढवून' घेतले होते.) की आता हा प्रवास सुरु होऊन आम्ही इप्सित स्थळी पोहोचणे हाच मुळी बोनस होता. दोनच दिवसांपूर्वी आम्ही हृषीकेशला गंगेचे रौद्र रूप भयचकित होऊन पाहिले होते. नदीचे शांत, प्रेमळ रूप मी ह्याआधी अनेकदा पाहिलेले आहे, परंतु कालीमातेचा हा संचार मी प्रथमच पाहत होतो. देवभूमी उत्तराखंडवर देवांची अवकृपा झाली होती.
"हिमभूल" - रोहतांग पास आणि मनाली (अंतिम भाग)
"हिमभूल" या मालिकेतील हा शेवटचा भाग. सर्व भागांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार.
१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली
सिमला व मनाली - रहायला चांगले ठिकाण सुचवा
जुने १ ते ७ सिमला व मनाली ट्रिप करणार आहोत. प्रवासात १० लोक आहेत.
रहायला TripAdvisor वगैरेवर शोधत आहेच पण कोणाला अनुभव असेल तर दोन्हीकडचेही रहायला चांगले ठिकाण सुचवा. फार महाग, ५ स्टार नको आहे.
तिथे खायला जे मिळेल ते खाऊच पण तरी आवर्जुन काही जाऊन खावेच असे एखादे ठिकाण असेल तर तेपण सांगा.
आधीच धन्यवाद.
जम्मु , मनाली, हिमाचल प्रदेश सहल
जम्मु आणि मनाली सहलीचे काही फोटो:
हा फोटो मी वैश्नोदेवीच्या डोंगरा वरतून काड्ला आहे.
हा पण फोटो मी वैश्नोदेवीच्या डोंगरा वरतून काड्ला आहे. समोरच्या डोंगरा वरती थंडीच्या वेळी सगळा डोंगर बर्फाने भरलेला असतो.
वैष्णो देवीच्या मंदिरा कडे जाण्याचा हा रस्ता आहे.
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १६ (अंतिम) - सारांश ... अर्थात माझ्या मनातला ... !
ही लेखमालिका आजच्या ह्या पोस्टने संपतोय. खरे सांगायचे तर ‘आता काही लिहायचे उरले नाही’ असे एकेठिकाणी वाटते आहे तर ‘हुश्श्श्.. झाले बाबा एकदाचे लिहून पूर्ण’ असेदेखील मनात आल्यावाचुन राहिलेले नाही. लडाखला बाईकवर जाउन येणे हे जितके परीक्षा पाहणारे होते तितकेच त्यावर लिखाण करणे सुद्धा परीक्षा पाहणारे होते. अर्थात माझे लिखाण वाचणे हे देखील तुमची परीक्षा पाहणारे होते बहुदा.. माझे इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत.