भाग १ - तयारी
भाग २ - पुणे ते रोहतक
सलग दोन दिवस भरपूर गाडी चालवल्याने आंम्ही ठरवलेल्या वेळापत्रकावर मात करून पुढे जात होतो. आजचा दिवस पानिपत साठी राखीव होता. रोहतक पानिपत अंतर फक्त ८० किमी होते.
रोहतकहून आरामात आवरून निघालो, एके ठिकाणी नाष्टा केला व लगेचच पानिपतला पोहोचलो. तेथे थोडी शोधाशोध करून "काळा आम्ब" (हे खास हरियाणवी लकबीतले नांव!) कडे कूच केले.
पानिपत.. आपल्या सर्वांचा एक हळवा कोपरा.
भाग १ - तयारी
सगळी तयारी झाल्यानंतरकी काही किरकोळ कामे राहिलीच होती म्हणून पहिल्या दिवशी फक्त पुणे ते ठाणे असा पल्ला मारायचे ठरले.
दुपारी दोन वाजता सर्वजण रोहितच्या घरी जमलो.. पुन्हा बॅगा नीट बांधल्या. थोडे फोटोसेशन झाले.
बॅगांची बांधाबांधी सुरू असताना...
![.](https://scontent-sit4-1.xx.fbcdn.net/t31.0-8/13490622_10206937893430194_3059755887864403216_o.jpg)
तयारी झाली...!!!!
मनरावने लेहवारी केली तेंव्हा भरपूर इनो घेतले होतेच. कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे.
अधिक आषाढ शुद्ध पौर्णिमा (२ जुलै)
अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी (३० जून)
अधिक आषाढ शुद्ध दुर्गाष्टमी (२५ जून)
अधिक आषाढ शुद्ध विनायक चतुर्थी (२० जून)
मंगलमूर्ती मोरया !
जूले …… !
कोणे एके काळी....
जेंव्हा केंव्हा भूगोल ह्या विषयात नकाशे येणे सुरू झाले, तेंव्हापासून तो माझा जास्तच आवडता विषय झाला. मला वाटत सहावी सातवीमधे असेल. पहिल्यांदा भारताचा नकाशा पाहीला तेंव्हा दोन नावांनी माझ लक्ष वेधून घेतल होत. एक लेह आणि दुसर गिलगिट. तेंव्हा या दोन जागांना कधितरी भेट द्यायची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. ती २, ३ वर्ष टिकली. नंतर ते मनातून निघून गेल. त्यानंतर दोन वेळा हिमालयात जाऊन आलो. पण लेहची काही आठवण झाली नाही.
गब्बर एक्प्रेस लेहमध्ये शिरली खरी पण आमचे हॉटेल कुठे आहे ते गब्बर एक्प्रेसच्या चालकाला माहित नव्हते. विचारत विचारत पुढे जाताना दोन तरुण वाट दाखवण्याच्या मिषाने सरळ गाडीतच चढले. त्यांचे स्टेशन आल्यावर 'आता असेच पुढे विचारत जा, हॉटेल सापडेल' हा सल्ला देऊन त्यांनी आम्हाला बाय बाय केले.
थोडे पुढे गेल्यावर एका म्हातारबाबांनी " हॉटेल तर लेहच्या दुस-या टोकाला आहे" म्हणुन आम्हाला परत यु टर्न मारुन परत पाठी धाडुन दिले.
आधीची रात्र हाऊसबोटीत अगदी सुखात गेल्याने आता कारगीलला कसले हॉटेल मिळतेय याची उत्सुकता होती. थकेहारे आम्ही हॉटेल ग्रीनलँडमध्ये अवतिर्ण झालो. हॉटेल चांगले होते पण श्रीनगरपासुन एक गोष्ट जाणवलेली ती तिथे अजुनच प्रकर्षाने जाणवली. श्रीनगरला हाऊसबोटीत जाण्यासाठी 'लवकर शिका-यात बसा, सामान मागुन येईल' म्हणुन जेव्हा बोटवाला घाई करु लागला तेव्हा आम्ही फुटपाथवर ठेवलेल्या आमच्या सामानापासुन हलायला अळंट्ळं करू लागलो. बोटवाल्याच्या ते लक्षात येताच तो वैतागला. 'सामानाची काळजी तुमच्या तिथे जाऊन करा, इथे कोणी तुमचे सामान चोरणार नाही, इथे तसले लोक नाहीयेत' म्हणुन तो बडबडायला लागला.