लदाख

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पानिपत.

Submitted by मनोज. on 8 July, 2016 - 10:19

भाग १ - तयारी

भाग २ - पुणे ते रोहतक

सलग दोन दिवस भरपूर गाडी चालवल्याने आंम्ही ठरवलेल्या वेळापत्रकावर मात करून पुढे जात होतो. आजचा दिवस पानिपत साठी राखीव होता. रोहतक पानिपत अंतर फक्त ८० किमी होते.
रोहतकहून आरामात आवरून निघालो, एके ठिकाणी नाष्टा केला व लगेचच पानिपतला पोहोचलो. तेथे थोडी शोधाशोध करून "काळा आम्ब" (हे खास हरियाणवी लकबीतले नांव!) कडे कूच केले.

पानिपत.. आपल्या सर्वांचा एक हळवा कोपरा.

शब्दखुणा: 

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पुणे ते रोहतक

Submitted by मनोज. on 28 June, 2016 - 13:12

भाग १ - तयारी

सगळी तयारी झाल्यानंतरकी काही किरकोळ कामे राहिलीच होती म्हणून पहिल्या दिवशी फक्त पुणे ते ठाणे असा पल्ला मारायचे ठरले.

दुपारी दोन वाजता सर्वजण रोहितच्या घरी जमलो.. पुन्हा बॅगा नीट बांधल्या. थोडे फोटोसेशन झाले.

बॅगांची बांधाबांधी सुरू असताना...

.

तयारी झाली...!!!!

शब्दखुणा: 

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.

Submitted by मनोज. on 16 June, 2016 - 12:35

मनरावने लेहवारी केली तेंव्हा भरपूर इनो घेतले होतेच. कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे.

विषय: 
शब्दखुणा: 

लदाख सायकल ने : गुलाबा ते मढी (भाग ३)

Submitted by हिंडफिरा on 29 April, 2016 - 09:31

आज मी २१ किलोमीटर सायकल चालवली. मी आज एक चूक केली कि आजच दिल्ली वरून आलो होतो. मनाली मध्ये एक दिवस थांबायला पाहिजे होते. शरीर अनुकूल होण्यासाठी.

सकाळी ५ वाजता अलार्म वाजला. मी उठलो ७ वाजता. तंबूच्या बाहेर येउन पाहिले तर एक गाय तंबूला चिकटूनच बसली होती. तंबू वरती शेन पण टाकले होते. मग मी ते धुवून घेतले. सामान बांधायला आणि ते सायकल वर चढवायला साडे आठ वाजले. नऊला तेथून निघालो.

विषय: 

लदाख सायकल ने : दिल्ली वरून सुरुवात (भाग १)

Submitted by हिंडफिरा on 20 April, 2016 - 02:08

लदाख सायकल ने : दिल्ली वरून सुरुवात (भाग १)

हा प्रवास माझे मित्र नीरज यांनी सायकल वरून केला आहे. हे प्रवास वर्णन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे असा आमचा उद्देश आहे. म्हणून हे प्रवास वर्णन त्यांच्या संमतीने भाषांतर करून देत आहे. काही ठिकानी मुद्दामुन हिन्दी चा वापर केला आहे. तर मग करू या सुरुवात प्रवासाला...

विषय: 
Subscribe to RSS - लदाख