सलग दोन दिवस भरपूर गाडी चालवल्याने आंम्ही ठरवलेल्या वेळापत्रकावर मात करून पुढे जात होतो. आजचा दिवस पानिपत साठी राखीव होता. रोहतक पानिपत अंतर फक्त ८० किमी होते.
रोहतकहून आरामात आवरून निघालो, एके ठिकाणी नाष्टा केला व लगेचच पानिपतला पोहोचलो. तेथे थोडी शोधाशोध करून "काळा आम्ब" (हे खास हरियाणवी लकबीतले नांव!) कडे कूच केले.
पानिपत.. आपल्या सर्वांचा एक हळवा कोपरा.
"२ मोत्ये गळाली, २७ मोहरा हरपल्या, सव्वा लाख बांगडी फुटली" त्या ठिकाणी जाण्याचे कितीतरी वर्षांपासून ठरवले होते. ते आज जमले होते.
पानिपत युद्धस्मारकाचे प्रवेशद्वार
प्रवेशद्वाराच्या आत दुचाकींसाठी मुबलक जागा होती
तेथेच असलेले हे दोन फलक
अधिक माहिती देणारा आणखी एक..
यातली अधिसूचना संख्या म्हणजे सर्क्युलर नंबर असावा पण तारीख..??
स्मारकाकडे जाणारा रस्ता..
हे स्मारक म्हणजे एक मोठे उद्यान आहे..
उद्यानाचा आणखी एक व्ह्यू..
कालच्या वादळाचा तडाखा येथेही बसला होता, जागोजागी पाणी साठले होते. त्यातून वाट काढतानाच अचानक स्मारकाने दर्शन दिले.
स्मारकाच्या जवळ भरपूर पाणी साठले होते. एका ठिकाणी बुट काढून ठेवले व अनवाणीच त्या पाण्यातून स्मारकाकडे गेलो.
स्मारक..
तेथेच हा एक माहिती फलक होता.
__/\__
तेथेच शेजारी एका ठिकाणी ही दोन भित्तीचित्रे कोरली होती
स्मारकाच्या आवारात एके ठिकाणी दोन मिनीटे बसलो. पुन्हा स्मारकासमोर जावून डोके टेकवले व बाहेर पडलो.
बाहेर पडून कर्नालच्या रस्त्याकडे गाड्या वळवल्या व कर्नाल मार्गे चंदीगडला पोहोचलो. येथे विजयच्या गाडीचे सर्विसींग करावयाचे होते.
आयुष्यात केंव्हा ना केंव्हा भेट द्यायच्या ठिकाणांमधले एक महत्वाचे ठिकाण आज सर केले होते. __/\__
(क्रमशः)
*******************
(हा भाग छोटा आहे याची कल्पना आहे. मात्र पानिपत स्मारकाच्या भेटीसोबत आणखी काही जोडणे शक्य झाले नाही.)
खरेच एकदा तरी इथे जायचेच आहे
खरेच एकदा तरी इथे जायचेच आहे !
वाचतेय . पुभाप्र
वाचतेय . पुभाप्र
पानिपत स्मारकाच्या भेटीसोबत
पानिपत स्मारकाच्या भेटीसोबत आणखी काही जोडणे शक्य झाले नाही. >>> अगदीच पटले हे.
माधव +१ पुभाप्र
माधव +१
पुभाप्र