चांगला चष्मा लाऊन मी एक्सपायरी डेट पहात होतो. अस वाटल एक भिंग लावाव मग कुठे दिसेल. जी माहिती ग्राहक म्हणुन तुम्हाला हवी असते तीच नेमकी बारिकश्या अक्षरात लिहलेली असते अन्न पदार्थ आणि औषधावर.
जसा आरटीओ चा नंबर प्लेट काय साईझ मधे असावी, कोणत्या रंगात असावी याबाबत काही नियम आहेत म्हणतात तसे औषधे आणि अन्नपदार्थांच्या बाबतीत असतात का ?
जर असतील तर त्याचे पालन का होत नसावे ? आणि नसतील तर ग्राहकांनी आग्रह धरावा का या बाबतची मते जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे.
नमस्कार
वेगळ्या धाग्यावर पुणे शहरातील डॉक्टर्सची अत्यंत उपयुक्त माहिती मिळतेय, पण पिं.चिं. / पिंपळे सौदागर/ वाकड/निगडी/ आकुर्डी येथील डॉक्टर्सची माहिती मिळत नाहीये.
या धाग्यावर आपण पिंपरी / चिंचवड / पिंपळे सौदागर / पिंपळे निलख/ वाकड / निगडी / आकुर्डी / चिखली / मोशी मधील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढी माहिती लिहूया. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.
बंगळुरुतले चांगले डॉक्टर (व्यक्ती म्हणुन + व्यवसायाने) आणि वैद्यकीय सेवाभावी संस्था यांची यादी.
नाव, गाव, पत्ता, वेळ, स्पेशलायझेशन, पॅथी.
नवी मुंबईतले चांगले डॉक्टर (व्यक्ती म्हणुन + व्यवसायाने) यांची यादी.
नाव, गाव, पत्ता, वेळ, स्पेशलायझेशन, पॅथी.
पैसा
आपल्या कुवतीनुसार
जो-तो कमवतो पैसा
चढ-ऊतार करत कधी
माणसांना रमवतो पैसा
पैशामुळं तर कधी कधी
माणूसकीलाही डागणं आहे
जगण्यासाठी हा पैसा की
पैशासाठी हे जगणं आहे,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
माझ्या एक परिचितांना (वय : ६१ वर्षे) सोरायसिस चा फार त्रास सुरु आहे गेली अनेक वर्षे. इतके दिवस सहन होत होतं तोवर काही क्रीम्स वापरत होते. पण आत्ता त्रास फार वाढलाय आणि त्यावर पायाचे दुखणे पण फार वाढलं आहे. शिवाय मधुमेहाचा त्रास आहेच.
संपूर्ण उपचार घेतल्याशिवाय आत्ता पर्याय नाही आणि त्यासाठी पुण्यातील डॉक्टर/वैद्य यांचा संदर्भ मिळेल काय. 'फॅमिली डॉक्टर' मध्ये "श्री सिद्धिविनायक आयुर्वेद फाउंडेशन" ची जाहिरात येते कायम याच्या उपचारा संदर्भात. त्यांना संपर्क करणार आहोतच, पण कुणाला अधिक माहिती अथवा अनुभव असेल तर नक्की लिहा इथे.
बर्याचदा वैद्यकीय रिपोर्ट, डिस्चार्ज कार्ड, हिस्टरी नोट, रेफरंस लेटर, इ. आरोग्यविषयक कागदपत्रांत वापरल्या गेलेल्या लघुरूपांचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. उदा. c बार, K/C, c/o, इ. (किंवा बर्याचदा ते लघुरूप, संज्ञा लिहिली आहे, हे ओळखता येत नाही.) त्यासंदर्भातल्या माहितीची देवाणघेवाण करण्याकरता हा धागा काढतो आहे. वैद्यकीय क्षेत्रातली मायबोलीकरांनी इथे जरूर लिहावे. धन्यवाद.
माझ्या मुलाचे वय पावणे दोन वर्षे आहे आणि वजन ९.८ किलो आहे. इतके दिवस डॉक ना विचारले तेव्हा ते त्याचे वजन ठिक आहे वगैरे म्हणायचे. दुसर्या डॉक ना दाखवले तेही तसेच म्हणाले होते. यावेळच्या व्हीजीट मध्ये मी डॉक ना परत सांगितले की त्याचे वजन बरेच दिवसांपासून स्थिर आहे. तेव्हा ते म्हणाले की त्याचे वजन १ वर्षे ते २ वर्ष या काळात १.५ किलो वाढायला हवे होते. सध्या ते फक्त ६०० ग्रॅम वाढलय.
त्याचा आहार असा आहे: - सकाळि ७.३० ते ८ - नाचणी सत्व (दुध घालून)
सकाळी ११ ते १२ - पोळी भाजी, भात, अंड्याची बुर्जी/ ऑम्लेट, वरण/ ताक
दुपारी ३ ते ४ - रव्याची खीर/ गव्हाच्या पीठाची खीर/ फळांचा मिल्क शेक
मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय ? पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )
१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
५) कुठल्या कंपूत होता ?
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?