Submitted by नितीनचंद्र on 11 June, 2016 - 01:07
चांगला चष्मा लाऊन मी एक्सपायरी डेट पहात होतो. अस वाटल एक भिंग लावाव मग कुठे दिसेल. जी माहिती ग्राहक म्हणुन तुम्हाला हवी असते तीच नेमकी बारिकश्या अक्षरात लिहलेली असते अन्न पदार्थ आणि औषधावर.
जसा आरटीओ चा नंबर प्लेट काय साईझ मधे असावी, कोणत्या रंगात असावी याबाबत काही नियम आहेत म्हणतात तसे औषधे आणि अन्नपदार्थांच्या बाबतीत असतात का ?
जर असतील तर त्याचे पालन का होत नसावे ? आणि नसतील तर ग्राहकांनी आग्रह धरावा का या बाबतची मते जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे.
जर मला पिटीशन बनवता आली तर इथे त्याची माहीती देईनच. पण इथे किमान प्रतिसाद मिळायला हवेत. त्या इमेल पिटीशनची कोणी दखल घेते किंवा नाही हा भाग वेगळा पण विषय तर लोकांपर्यंत पोचायला हवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनुमोदन! बरेच वेळ ही माहिती
अनुमोदन! बरेच वेळ ही माहिती emboss केलेली असते जी व्यवस्थित दिसत नाही. Mfg date & Expiry date दोन्ही ठळक अक्षरातच असाव्यात आणि त्या तारखाच्या स्वरुपातच असव्यात. 12 months from the date of manufacturing वगैरे प्रकार नसले तर उत्तम.
ह्या लिंक्स मिळाल्यात
ह्या लिंक्स मिळाल्यात -
http://foodsafetyhelpline.com/2013/10/food-labelling-requirements-date-o...
http://foodsafetyhelpline.com/2014/07/what-are-the-guidelines-on-best-be...
आजकाल भारतीय राजकारणात देखिल
आजकाल भारतीय राजकारणात देखिल बरेचसे एक्सपायरी डेट संपलेले नेते सक्रिय आहेत, त्यांच्या पासून सुटका कधी मिळेल कुणास ठाऊक.
अगदी अगदी.. 'मुरली' वाजवणारे
अगदी अगदी.. 'मुरली' वाजवणारे कधिकाळीचे 'यशवंत' 'कृष्ण' !
असा नियम भारतात आहे का माहित
असा नियम भारतात आहे का माहित नाही, पण ज्या उत्पादनाची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे, ती उत्पादने दुकानात वेगळी ठेवावीत असा नियम ओमानमधे होता. आणि ती तारीख उलटून गेलेली उत्पादने तर शेल्फ वर ठेवताच येत नसत. आणि ह्या नियमाचे पालन होते आहे कि नाही, हे बघायलाही कार्यक्षम सरकारी यंत्रणा होती.
प्रसाद. आणि विठ्ठल.. या
प्रसाद. आणि विठ्ठल.. या धाग्यावर राजकारण नाही आणलेत तर उत्तम होईल _____/\_____
बरेच वेळ ही माहिती emboss केलेली असते जी व्यवस्थित दिसत नाही. Mfg date & Expiry date दोन्ही ठळक अक्षरातच असाव्यात आणि त्या तारखाच्या स्वरुपातच असव्यात. 12 months from the date of manufacturing वगैरे प्रकार नसले तर उत्तम.
>> अनुमोदन.
माझा तसा विचारही नव्हता आणि
माझा तसा विचारही नव्हता आणि नाही हे पहिल्या प्रतिसादावरिन दिसुन येईल.
मी सहजच ते गमतीत
मी सहजच ते गमतीत लिहिलेले.
असो.
मी नेहमी एक्स्पायरी डेट्स आणि
मी नेहमी एक्स्पायरी डेट्स आणि नसेल तर Mfg date पासुन किती दिवस वॅलिड आहे हे चेक करुन घेतो. भारतात विकणार्याला विकत घेणार्याबद्दल काही सोयरसुतक नसते. कृपया स्वतःच खबरदारी घ्या.
पीयू यांच्याशी सहमत!
पीयू यांच्याशी सहमत!
पीयू यांच्याशी सहमत!
पीयू यांच्याशी सहमत!