नवीन सभासदांसाठी प्रश्नावली

Submitted by दिनेश. on 19 June, 2015 - 06:33

मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय ? पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )

१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
५) कुठल्या कंपूत होता ?
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?
८) तूम्हाला पिकासावरून फोटो अपलोड करता येतात का ? कुठे शिकलात ?
९) नवीन पाक़कृतीत फोटो थेट अपलोड करता येत नाहीत, हे तूम्हाला माहीत आहे का ? आणि तरी ते कसे करायचे हे तूम्हाला माहित आहे का ?
१०) नवीन धागा आणि नवीन पान यातला फरक सांगा.
११) चुकून दोनदा उघडलेला बीबी डिलीट करायला, काय करावे लागते ?

१२) अ‍ॅडमिनना विपू कशी करायची ?
१३) तूमच्या आयडीत जो नंबर आहे, त्याचा अर्थ काय ?

१४) मायबोलीवरच्या कुणाला प्रत्यक्ष भेटला आहात का ? का भेटलात ?

१५) मिपा वरचा आयडी कुठला ?

१६) २४ हे काय असतं ? ते कसे करतात ?

१७) कविता, गझला करता का ? का ?

१८) प्रोफाईलमधला फोटो तूमचा आहे का ? कशावरून ?

१९) प्रोफाईलमधे स्त्री का पुरुष, ते का लिहिले नाही ?

२०) दिवसातून किती तास देऊ शकता ? ( पडीक )

या आता !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त प्रश्नावली दिनेशदा. Happy

३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
<<
<<
हा प्रश्न वाचल्यावर मला इथले अनेकजण आठवले, ज्यांच्यावर कारवाई पक्षी हकालपट्टी कोणत्या कारणासाठी आणि कितीवेळा झाली हे त्यांना तरी सांगता येईल का?

१६) २४ हे काय असतं ? ते कसे करतात ? <<<<
हा प्रश्न समजला नै मला... >>> ते १८+ लोकांसाठी आहे. लिंबुटिंबु असाल तर कसं समजणार ? Light 1

मस्त. Happy

बाय द वे, हे वर्षाविहार काय प्रकरण असतं
एकदा सहभागी होतोच मी.

-दिलीप बिरुटे

भारी आहे Proud

अवांतर -
जोक्सचा भाग वगळला तर हे चुकीचे आणि दुर्दैवी आहे
>
मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते.
>

धन्यवाद !!

ऋन्मेऽऽष , हे सगळे लाईटली आहे रे. माझं तेरावं ( वर्ष) आणि त्यानंतर बारावा ( आठवडा ) सरला नुकताच !

दिनेशदा, हो अर्थातच.. म्हणून जोक्सचा भाग वगळता असे नमूद केलेय..
अन दुर्दैवी अश्यासाठी म्हटलेय की वातावरण गढूळ असल्यास बरेचदा एखाद्या जेन्युईन प्रोफाईलवरही संशय घेतला जातो..
असो, उगाच हलक्याफुलक्या धाग्यात सेंटी नको Happy

कु ऋ,
माझे १५ वर्ष ३६ आठवडे सरलेत माबोवरचे. मी जॉइन झाले तेव्हा माबो एखाद दोन वर्ष जुनी झालेली होती.
वेमांचे लेखन बघितलेस तर त्यात माबोचा इतिहास तारखांसकट मिळेल.

दिनेश Biggrin

खरंच आजकाल कोणत्याही नव्या आयडीशी बोलायची भिती वाटते.
एका नवीन आयडीला तो (आयडी) नवीन असतांना एंटरटेन केले होते.
नंतर त्या आयडीने खुप गळेपडूपणा केल्याने ते थांबवले.

कालच्या पानिपतात तोही आयडी उडाला असल्याने, "बापरे.. मी कुणाशी बोलत होते" असं फिलींग आलं.

१६) २४ हे काय असतं ? ते कसे करतात ? <<<<
हा प्रश्न समजला नै मला...>>> मला पण >> मला ही. >> मलाही कळाला नव्हता..
वर साती यांनी दिलेली लिंकवर जाऊन फिरून आलो मग कळाले .. धन्यवाद साती .. Happy
भलतेच मजेदार प्रकरण आहे.. त्यावेळी माबोवर एकंदरच अधिक बंधुभाव आणि धमाल होती असे वाटले..

तूमच्या आयडीत जो नंबर आहे, त्याचा अर्थ काय ?<<<<< Rofl

Lol

दिनेशदा, धमाल आहे ही प्रश्नावली.
१७) कविता, गझला करता का ? का ? >>>> हा प्रश्न फक्त नविन सदस्यांकरता राखीव नका ठेऊ प्लीज.

Pages