पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

Submitted by रंगासेठ on 25 February, 2016 - 02:45

नमस्कार

वेगळ्या धाग्यावर पुणे शहरातील डॉक्टर्सची अत्यंत उपयुक्त माहिती मिळतेय, पण पिं.चिं. / पिंपळे सौदागर/ वाकड/निगडी/ आकुर्डी येथील डॉक्टर्सची माहिती मिळत नाहीये.

या धाग्यावर आपण पिंपरी / चिंचवड / पिंपळे सौदागर / पिंपळे निलख/ वाकड / निगडी / आकुर्डी / चिखली / मोशी मधील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढी माहिती लिहूया. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेडिअट्रिशियन
डॉ किणीकरः पिंपळे सौदागर मध्ये साई ओर्किड सोसायटीत रो हाऊस मध्ये दवाखाना आहे, सकाळी ११ पासून असतात. (वीकेन्ड ला २५-३० नंबर असतात तिथे.)

माझा अनुभव पिंपळे सौदागर मधील -:

जनरल फिजिशिअनः

१) डॉ. अहिरे - हिलिंग टच हॉस्पिटल (डिग्री माहिती नाही Sad ) - मला व माझ्या पत्नीला अत्यंत चांगला अनुभव आहे यांचा.

२) डॉ. खन्ना (MBBS) - कुणाल आयकॉन शॉपिंग काँप्लेक्स - अत्यंत अनुभवी व स्वभावाने सालस. एकदम आपुलकीने सर्व माहिती विचारतात व तपासण्या करतात.

डॉ ओसवाल, (MBBS ), डान्गे चौक, चिन्चवड स्टेशनकडुन हिन्जवडीकडे जाताना डाव्या हाताला वळायचे. समोर रोड क्रॉस करुन जायचे. छोटे क्लिनीक आहे. नीट पत्ता मिळाला की लिहीते. अचूक निदान, डॉ म्हणून एकदम पर्फेक्ट. वागायला परखड पण डिसेन्ट. जनरल फिजीशीयन. लहान मुलाना तपासत नाहीत, नेऊ नका. डॉ तसे स्पष्ट सान्गतात.

ईएनटी स्पेशॅलिस्ट सांगा .
मला आजपर्यंत पिंचि मधे एकही चांगला डॉक मिळालेला नाहीये. कोणाचाही कधीच गूण नाही आला घरात कोणालाच

रीया, मैत्रिणीने सान्गीतलेले, अनूभवलेले सान्गते. निगडी बस स्टॉप मागे जी बिल्डिन्ग आहे, त्यात ( मागुन जायचे) दुसर्‍या मजल्यावर डॉ. सौ. लीना सिद्धापुरे आहेत, त्या ईएन्टी स्पेशालीस्ट आहेत. रिझल्ट चान्गला आहे. सकाळी ११ ते दुपारी १-२ आणी सन्ध्याकाळी ७ ते ९ असतात. फोन न. मिळाला की देते. फोनवर् आधी नाव नोन्दवुन गेलेले उत्तम.

पिंचिं मध्ये चांगला ओर्थोपेडिक- धनश्री हॉस्पिटल, डॉ. राजीव पटवर्धन

(संपादित)

मीनाक्षी पेन मॅनेजमेंट - डॉ. यशवंत नानकर
(दीर्धकालीन भूल देऊन दुखणे ताब्यात ठेवतात)

साबुना पोस्ट हर्पिज पेन साठी पोटापासून पाठीपर्यंत अॅनेस्थेशिया दिला होता. दोन वर्षे (साबु देवाघरी जाईपर्यंत) प्रभाव टिकला होता.

डॉ रत्नपारखी ( आर्थोपेडीक ), उत्तम रीझल्ट, पेशन्टचे व्यवस्थीत ऐकुन घेतात. सेन्ट उर्सुला हायस्कूल समोर, निगडी. पुण्याकडुन मुम्बईकडे जाताना, निगडी बसस्टॉप चौकात डावीकडे वळुन सरळ गेले ( जास्त नाही) डावीकडेच पहिले वळण आहे, तिथुन उजवीकडे जो रस्ता जातो त्या वळणावर आहेत. पिम्परीची कला अकादमी आहे, त्याच्या बाजूने ते वळण आहे. आमचे नातेवाईक, डॉ शारन्गपाणीन्कडे जाऊन आल्यावर जे वैतागले होते, त्या नन्तर त्याना यान्चे नाव समजले. जास्त औषधे नाहीत, उगाच पैसा उकळणे नाही. गरज असेल तर औषधे आणी बाकी व्यायाम.

धन्स रश्मी, दे लवकर प्लिज Happy

न्युरोसर्जन - मॅक्स न्युरो हॉस्पिटल कासारवाडी डॉ. फाळके

>>:)सिरिअसली? कानाला खडा आहे या डॉक्टर बाबत. जो अनुभव आम्ही घेतलाय तो जगात देव कोणालाही देऊ नये.
(कानाला खडा वाल्या डॉक्टरच्या धाग्यावर मी लिहिलंय खरं की आम्हाला कोणाचाच वाईट अनुभव आला नाही पण हे नाव वाचलं आणि मागच्या वर्षीचे हेच दिवस डोळ्यासमोर अगदीच तरळले Sad अर्थात मी त्यांना माफ करून टाकलंय त्यामुळे वाईट अनुभवांमधे मी यांना पकडणार नाही . कोणाकडे जाऊ नये याचा धडा यांनी दिलाय त्यामुळे ते ही चांगलेच डॉक्टर)

Ho Rashmi Dr.Leena Siddapur aatishay hushar ahet.2 diwasa adhi mulachya kan dukhivr chan medicine dile tyani. Ek dose madhe maza poraga nachayla lagla. Sorry for English font.but Marathi type hot nheye

Ho Rashmi Dr.Leena Siddapur aatishay hushar ahet.2 diwasa adhi mulachya kan dukhivr chan medicine dile tyani. Ek dose madhe maza poraga nachayla lagla. Sorry for English font.but Marathi type hot nheye

पिंचिं मध्ये चांगला ईएनटी स्पेशॅलिस्ट..उत्तम रीझल्ट

Kulkarni Ent Hospital
Shwetambar Apartment, Akurdi, Pune - 411035,
Vivek Nagar Opposite Bajaj Auto
Behind Hira Bakery
+(91)-20-27242729
+(91)-9423014928

खरंच रीया? माझ्या साबांना फाळकेनी चांगली ट्रीटमेंट दिली. म्हणून नाव दिले. जमले तर डिटेल्स सांग म्हणजे तुझ्या अनुभवाचा फायदा होईल

Gynecologist - डॉ. शशिकला रन्ना, निगडी
Orthopedician - डॉ. दिवान, निगडी
ENT Specialist - डॉ. सौ. लीना सिद्धापुरे, निगडी

धन्वंतरी हॉस्पिटल मधले डॉक्टर सुद्धा चांगले आहे.

@रीया डॉ. लीना सिद्धापुरे - 02027602083 / 9423578368
@रश्मी.. डॉ रत्नपारखी आमचे सख्खे शेजारी आहेत. Happy ते पण उत्तम डॉक्टर आहेत

आकुर्डी / निगडी येथे डेण्टिस्ट : डॉ. सना मोकाशी
अत्यंत माफक दारात अतिशय चांगली ट्रिट्मेण्ट (स्वानुभव) …
आकुर्डी भाजी मंडई समोर , विवेकनगर , आकुर्डी , ४११०३५
मो. - ७२६४८८९९८६ / ८१८०८६४७१३ .

Dr. Mokashi's Dental Clinic
Address: R K Apartment, Near Akurdi Sabji Mandai,
Lane Number 4, Vivek Nagar, Akurdi,
Pimpri-Chinchwad, Maharashtra 41103

पल्मोनॉलॉजिस्ट (श्वसनसंस्था व फुफ्फुस विषयी)- डॉ. तुषार सहस्त्रबुद्धे

फोन नं. - +(91)-20-27359265
पत्ता : Office No 115, Gokhale Plaza, Above Chawadi Restaurant, Chinchwad, Pune - 411019, Opposite Ramkrishna More Auditorium

माझ्या पत्नीस अस्थमा असल्याचा संशय व्यक्त केला होता सोलापूरच्या डॉ.नी , तेव्हा डॉ. सहस्त्रबुद्धेंना दाखवलं. अतिशय चांगला अनुभव, डॉक्टरांनी पूर्ण वेळ दिला, सर्व शंकांच निरसन केलं न चिडचिड करता! (आमच्यावर Wink )

फक्त अपॉइंटमेंट मिळायला फार वेळ लागतो.

इश्श > +१
८० च्या दशकातली चिंचवडातली बरीचशी मुले कामत हास्पिटलातच जन्मली असतील Happy मी ही त्यातलाच.. Happy

बाकी आमचे फॅमिली डॉक होते डॉ. पिंगळे. तानाजीनगर, चिंचवडला होता दवाखाना. आता ते प्रॅक्टीस करत नाहीत. अतिशय उत्तम डॉक.

चिंचवडातल्या डोळ्याच्या दामले बाईकडे मात्र चुकुनही जावू नका. फार वाईट अनुभव आहे.

डोळ्यान्साठी डॉ. रत्नमाला साळुन्के ( एकदम छान), डॉ. लीना सिद्धापुरेन्शेजारीच ( निगडी) यान्चे क्लिनीक आहे, पण आदल्या दिवशीच अपॉईन्टमेन्ट फोनवरुन घ्यावी लागते. आठवड्यातुन तीन दिवस सकाळी ११ ते १ असतात. शनीवारी सन्ध्याकाळी ७ ते ९ आहेत. उत्तम अनूभव. तिथे दुसर्‍या डॉक येतात, पण जाउ नका. साळुन्केनाच भेटा.( माझा यात वै. फायदा नाही)
नन्तर फोन न. लिहीते.

Gynecologist : डॉ. वैजयंती कामत, चापेकर चौक, चिंचवड.>>> हो.त्यांचाच मुलगा,अमित कामत हे ही गायनॅकोलॉजिस्ट आहेत.

Pages