चला थोडे जाणून घेऊया होमिओपॅथीच्या शोधाबद्दल !!
गेली दोनशे वर्षाहून अधिक वर्ष रुग्णांच्या मनावर राज्य करणारी ही उपचार पद्धती तशी अपघातानाचे जन्माला आली. "डॉ. सॅम्युअल हॅनीमन" नामक एका जर्मन डॉक्टरांनी या पॅथीचा शोध लावला. घडलं असं की स्वतः पेशाने एम.डी.अॅलोपॅथीक प्रॅक्टीशनर असणार्या डॉ. हॅनीमन यांना एक गोष्ट मनोमन छळत होती ती म्हणजे आपण आपल्या रुग्णाला कायमस्वरूपी का बरं करू शकत नाही.१७८१ सालापासून ते तत्कालीन उपचार पध्ह्ती वापरत होते पण ती उपचार पद्धती त्यांना सदोष वाटत होती ती तिच्या सोबत होणार्या साईड इफेक्ट्स मुळे. शिवाय तात्पुरतं बरं करण्याकडे तिचा कल होता. म्हणूनच संशोधक, लेखक आणि आनुवादक होण्याचा मार्ग त्यांनी स्विकारला.