काही दिवसापूर्वी आम्ही आमच्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याचा १०-१२ वर्षाचा मुलगा बॅडमिंटन स्पर्धेत दुसरा आला होता. आम्हीं त्याचे खूप कौतुक करत होतो. थोड्या वेळानी तो मुलगा आपल्या खोलीत निघून गेला आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा तो मित्र म्हणाला "अरे कसलं कौतुक करताय?? बॅडमिंटनचे टूर्नामेंट वगैरे काही नव्हती. २ मुलांच्या मॅचमध्ये हा हरला म्हणून दुसरा आला!!!" मित्र पुढे म्हणाला "मुलांना तुम्ही हरलात हे म्हणायचे नाही असे शाळेने सांगितले आहे. तसे म्हटले की मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणून तो त्याच्या खोलीत गेल्यावर हे तुम्हाला सांगितले" मी अवाकच झाले.
यात सांगण्यासारखे, इथे लिहीण्यासारखे खरे तर काय आहे?
मी एका स्पर्धेत भाग घेतला, व अगदी सुरवातीच्या तासाभरातच मला स्पर्धेतून स्वेच्छेने बाहेर पडावे लागले, यात अभिमानाने सांगण्यासारखे खरे तर काहीही नाही. एका वाक्यात कळवता येते.
तरीही, वैयक्तिक अक्षमतेव्यतिरिक्तची बाहेर पडावे लागण्याची कारणमिमांसा माहित व्हावी म्हणून स्वतःच्याच फजितवड्याबद्दल हा लेखन प्रपंच.
दिनांक २८ मार्च, २०१५ रोजी पुणे युनिव्हर्सिटीच्या मुख्य गेटपासून रात्री ७ वाजता BRM200 या रेसला सुरुवात होणार होती व १३ तासात २०० किमी अंतर कापून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० ला संपणार होती.
दहावी-बारावीच्या निकालाचे दिवस जवळ आले की साधारणत: आपल्याला आठवतात ते कौतुकाचे बोल, पेढे आणि पुष्पगुच्छ. पण परीक्षेत मिळवलेल्या यशाबरोबरच शक्यता असते अपयशाची. अगदी वर्षभर अभ्यासू वृत्तीने मेहनत घेऊन चाचणी परीक्षेत पैकीच्यापैकी गुण विद्यार्थ्यापासून ते काही कारणांमुळे मनाजोगता अभ्यास न होऊ शकलेल्या विद्यार्थ्याला भेडसावणारा राक्षस म्हणजे अपयश; आणि हे अपयश म्हणजे फक्त परीक्षेत नापास होणे नाही, तर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळणे हे सुद्धा एक प्रकारे अपयशच.
बंद झाल्या सर्व वाटा डंख काळाचे विषारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी
टाक मागे व्यर्थ भीती टाक मागे जीर्ण नाती
वादळा ये म्हण निघालो आज मी काढून छाती
सोस तू आघात सारे ठेव कष्टांची तयारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी
गाठ तू ध्येयास ऐसे साधका आदर्श व्हावे
व्हायचे ज्याला यशस्वी हेच त्याने आचरावे
हो दिवा अंधार पी तू उजळुदे ही रात्र सारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी
तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२० जानेवारी २०१२, ०६:००