प्रेरणादायी

रडत नाही, लढतोय!

Submitted by मंदार शिंदे on 1 June, 2012 - 07:54

तोः
रडतोय रडतोय, मी रडतोय रडतोय
मिळत नाही मागेन ते म्हणून
रडतोय रडतोय

मीः
लढतोय लढतोय, मी लढतोय लढतोय
मागणार नाही, घेण्यासाठी
लढतोय लढतोय

तोः
रडतोय रडतोय, मी रडतोय रडतोय
काय झालं काय होईल म्हणून
रडतोय रडतोय

मीः
लढतोय लढतोय, मी लढतोय लढतोय
केलं मीच करणार मीच, बघ
लढतोय लढतोय

तोः
रडतोय रडतोय, मी रडतोय रडतोय
माझं हे माझं ते, हरवेल म्हणून
रडतोय रडतोय

मीः
लढतोय लढतोय, मी लढतोय लढतोय
माझी हिम्मत माझं जग, हात तर लाव
लढतोय लढतोय, मी लढतोय लढतोय
रडत नाही तुझ्यासारखा मी
लढतोय लढतोय
पटत नाही ते बदलण्यासाठी
लढतोय लढतोय
सुंदर भविष्य घडवण्यासाठी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

घे भरारी

Submitted by तुषार जोशी on 20 January, 2012 - 21:57

बंद झाल्या सर्व वाटा डंख काळाचे विषारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी

टाक मागे व्यर्थ भीती टाक मागे जीर्ण नाती
वादळा ये म्हण निघालो आज मी काढून छाती
सोस तू आघात सारे ठेव कष्टांची तयारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी

गाठ तू ध्येयास ऐसे साधका आदर्श व्हावे
व्हायचे ज्याला यशस्वी हेच त्याने आचरावे
हो दिवा अंधार पी तू उजळुदे ही रात्र सारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२० जानेवारी २०१२, ०६:००

गुलमोहर: 
Subscribe to RSS - प्रेरणादायी