माझ्या वडिलांचा उजवा कान खुप दुखत आहे ..६ महिन्यापासून हे दुखणे आहे . कानाच्या आतमधे ठणका येतो..
यावर अम्ही प्रथम फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला..त्याने आराम मिळाला नाही.. त्यांनी पेन किलर दिल्या ..तेवढ्यापुरते बरे वाटायचे ..मग कान नाक घसा तज्ज्ञ ला भेटलो ..त्यांनी दुर्बिणी मधून कानाची तपासणी केली ..
कान स्वच्छ आहे ..कोणतेही स्त्राव नाहीत.. नंतर त्यांच्या गोळ्यांनी फरक पडेना ..आणि निदान होइना ..
आम्ही सोनोग्राफी केली . सीटी स्कॅन केले ..एका डॉक्टरचे मत आहे , तिथली एक नस ` ओव्हररीअॅक्ट` होत आहे म्हणून दुखत आहे ..तर दुसर्या डॉक्टरचे मत आहे , कानाच्या आतील हाडाला सूज आह ..
दोन्हीचे उपचार घेउन काही फरक पडला नाहिये..
आम्ही सर्व दात , दाढा त्यांची मुळे यंचा एक्स रे काढून पाहिला ..त्याचा काही प्रॉब्लेम नहिये..
अॅलोपथी, अयुर्वेदिक , होमीओपॅथी सर्व उपचार पद्धती करून झाल्या...अजून कान दुखणे थांबले नाही..
पुण्यामधे कानावरील उपचारासाठी कोणी तज्ज्ञ डॉक्टर माहिती आहे का ?
कृपया नावे सुचवा आणि कोणाला असा अनुभव असल्यास माहिती शेअर करा..
धन्यवाद