कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ३
कर्कोपचार
अनेक कर्करुग्णांना त्यांच्या आरोग्यनिगेबाबत निर्णय घेण्यात सक्रिय सहभाग हवा असू शकतो. तुमचा रोग आणि त्यावरील उपचारांचे पर्याय यांबाबतचे सर्व काही जाणून घेण्याची इच्छा असणे स्वाभाविकच आहे. मात्र, निदानापश्चातचा धक्का आणि तणाव हे सोसण्यास अवघड असतात. त्यामुळे डॉक्टरला विचारायच्या सर्व गोष्टी लक्षात येणेच कठीण असते. म्हणून डॉक्टरांची भेट ठरविण्यापूर्वीच त्यांना विचारायच्या प्रश्नांची एक यादीच करून ठेवणे सोयीचे ठरत असते.