ती मधुचंद्राची रात्र … छे काळरात्र !
"सर,मिसेस सिन्हा त्यांच्या मुलीला घेवून आल्या आहेत. त्यांना तुमच्या चेंबरमध्ये बसवले आहे."
मी क्लिनिक मध्ये दुपारी प्रवेश करीतच होतो एव्हड्यात माझ्या रीसेप्शनीस्टने मला थांबवून असा निरोप दिला.
दखल घेतल्याप्रमाणे मान हलवून मी माझ्या खोलीत शिरलो.
"हलो, म्याडम, कसे काय येणे केलेत ?"
ॲडम, इव्ह आणि सफरचंद … पण किंचितसे किडलेले !!
"डॉक्टर, गेले सहा दिवस मी आजारी आहे."
रात्रीचे दहा वाजले होते. दिवसभरातील पाहिलेल्या आणि लक्ष्यात राहिलेल्या पेशंटांचा विचार करीत नुकतीच पाठ टेकवली होती, एव्हड्यात मोबाईल वाजला. स्वतःवर थोडासा वैतागुनच मोबाईलवर दिसणारा नंबर पहिला. +१ म्हणजे अमेरिकेतून आलेला दिसल्यामुळे पटकन स्लाईड करून कानाला लावला आणि उत्तरलो, "हलो, मी डॉक्टर शिंदे बोलतोय !"
"अरे, मी सुर्यकांत शहा बोलतोय, जाड्या शहा ! ओळखलेस का?"
जाड्या शहा माझ्या बरोबरच एमबीबीएस होवून अमेरिकेत गेला व नंतर न्युरोलोजी शिकून तेथेच स्थायिक झाल्याचे मला माहीत होते.
१९६६ च्या सुमारास एक विज्ञानरंजक चित्रपट पहिला होता, "fantastic voyage ". शास्त्रज्ञांनी कोठलीही वस्तू अतिसूक्ष्म करण्याची क्रिया शोधलेली असते पण हा परिणाम फक्त एक तास टिकत असतो. एका रशियन शास्त्रज्ञाने हा परिणाम जास्त वेळ करण्याचे आणि पुन्हा पूर्ववत करण्याचे तंत्र शोधलेले असते. अर्थातच अमेरिकेला हे तंत्र हवे असते. तो शास्त्रज्ञ अमेरिकेत पळून जात असताना रशियन हेर त्याला गाठतात आणि त्या मारामारीमध्ये त्या शास्त्रज्ञाला डोक्याला मार बसून मेंदूमध्ये रक्ताची गाठ होवून तो बेशुद्ध पडतो.
करायला गेलो एक आणि … - एक वैद्यकीय सत्यकथा !
१ जानेवारी २००८ !
स्थळ : सिंगापूर मधील एक मोठे पब्लिक हॉस्पिटल.
नवीन वर्षाची सकाळ. हॉस्पिटल मधील सर्व व्यवहार मात्र नेहेमीप्रमाणेच चालू. बाह्य रुग्ण विभाग मात्र नेहेमीपेक्षा जास्तच गजबजलेला ! सिंगापूर शहर नववर्ष रजनीच्या धुन्दिमधुन हळूहळू जागृत होत होते. बहुतेक वॉर्ड दारू पिवून बेहोष झालेल्या रुग्णांनी आणि त्यांनी घडवलेल्या अपघातामध्ये हकनाक सापडलेल्या निरपराध व्यक्तींने भरला होता.
अॅलोपथी मधल्या पेन किलर्स बद्दल अनेक समज गैरसमज आहेत. त्यातले दोन मुख्य -
१. कोणत्याही दुखण्यावर वेदनेवर पेन किलर्स घ्यावेत, त्याने असलेला त्रास बरा होतो. पेन किलर्स स्वतःच्या मनाप्रमाणे घेतले तरी चालतात.
२. पेन किलर्स घेऊ नयेत. सवय लागते. त्याने किडनी इत्यादीवर परिणाम होतो.
ज्यांना वाटते पेन किलर्स हा सर्व दुखण्यांवर उपाय आहे ते डॉना न विचारता पेन किलर्स घेतात.
आणि ज्यांना वाटते पेन किलर्स कधीही घेऊ नयेत ते लोक डॉने सांगितले तरी पेन किलर्स घेत नाहीत.
माबो वरच्या डॉ.नी पेन किलर्सबद्दल अधिक माहिती द्यावी ही विनंती.
कॅलिफोर्नियास्थित माझ्या मुलीच्या घरासमोरच सायप्रसचे एक उंचच उंच झाड आहे ज्याचे मी गमतीने नाव ठेवले आहे,- 'अमिताभ' ! तसा संपूर्ण कॅलिफोर्निया घनदाट वृक्षराजीने बहरलेला आहे, अगदी मेपलच्या सडसडीत खोडापासून ते रेडवूडच्या भारदस्त बुन्ध्यांपर्यंत! या झाडांकडे केंव्हाही नजर टाकली तर हमखास दिसतात इकडून तिकडे पळणाऱ्या अनेकविध रंगांच्या चिमुकल्या खारोट्या ! या बुद्धिमान, शिस्तबद्ध आणि कामसू खारींच्या देशातील तशाच कर्मयोगी माणसांच्या अथक प्रयत्नांची हि एक कथा नव्हे तर गाथा !
___________
हॅलो,
मुळव्याधीच्या उपचारांसाठी पुण्यातील चांगले खात्रीशीर डॉक्टर/ हॉस्पीटल सुचवा
स्त्री डॉक्टर असेल तर उत्तमच
सर्जरी करायची असल्यास साधारणतः किती खर्च येइल
बाबा आणि सोनू........
---------------- || श्री || -------------
दिनांक १७ सप्टेंबर २०१३
पुणे.
प्रिय सोनू,
खरं तर तू एवढी मोठी झाल्यावर हे पत्र मी तुला लिहितोय याचे तुला आश्चर्यच वाटेल - कारण मी तुझ्याशी कायमच मित्रत्वाने आणि मोकळेपणाने बोलू शकतो. पण मग पत्राचे कारण काय ? खरंच, कारण नक्की काय आहे असे विचारले तर माझ्याकडे काहीच कारण नाही.... तरी पण ...
एक कारण जरुर आहे.