त्याची पावसाला आर्जवे
नकोच पडु आता .
तिचीही पावसाला विनंती
चिंबच भिजव आता ...
त्याचा पाऊस म्हणजे
चिखलाने वैतागलेला
तिचा पाऊस म्हणजे
मृदगंधाने शहारलेला...
पाऊस त्याचा पाऊस तिचा
दरवेळी दोघांचा ठरलेला वाद
सैरावैरा पावसासारखे दोघेही
धुमसायचे मनातल्या मनात...
पाऊस थोडा ओसरला की
दोघेही शांत व्हायचे.
श्रावणसरींनी बरसल्यावर जसे
पुन्हा ऊन पडायचे...
पाऊस तुझा पाऊस माझा
वाद शेवटी मिटायचा
मिठीत सामावताच दोघे
पाऊस पुन्हा बरसायचा...
- १२-०६-२०१८ निखिल..
कोणे एके काळी..
सात च्या आत घरात हा संस्कृतीचा भाग होता, शिस्त म्हणून नव्हे. पोटभरून खेळल्यावर मग घरी आल्यावर छान अंघोळ करून वडीलधार्यांना नमस्कार करून देवापुढे दिवा लावून श्रीमद्भगवद्गीता, श्री रामरक्षा, हनुमान स्तोत्र ई. म्हणायचे. दूरदर्शनवर असलेले एखादे परिवार 'धारावाहिक' बघून मग सर्वांनी एकत्रीत रात्रीचे जेवण करायचे आणि दुसर्या दिवशीचे दप्तर भरून झोपी जायचे. पुनः सकाळी ७ वाजता दुसरा दिवस सुरू..
सोनेरी कणांचा भार..
माझ्या मिटल्या पापण्यांवर..
किलकिलत्या डोळ्यांत
दिसलास फक्त तू..
मग तोच खुळा प्रयत्न..
तुला एक स्पर्श करण्याचा..
तुझ्या एक स्पर्शानं
सोनं होण्याचा..
तुझाही तोच खेळ
माझ्याशी..
माझ्या वेड्या मनाशी..
तुझ्या अभासांपाठी धावणारी मी..
अन मला बघून हसणारी तुझी सावली..
बेचैन होणं ही नेहमीचंच माझं..
आज मात्र थांबले क्षणभर..
वेडावणाऱ्या तुझ्या सावलीकडेच उत्तर मागितलं मी..
अन बघता बघता उमगलं,
माझ्या झोळीत मावणारा नाहीचेस तू..
मग तुझ्या त्या सोनसळी कणांना
एक एक करत वेचायचा
पुन्हा एक जीवघेणा खेळ..
ध्यास एकच..
एक पसाभर 'तू' मिळावास
मनभर व्यापून राहिलेलास..
माझा भारत देश
सारे जहाँ से अच्छा असा हा माझा भारत देश
नानाविध संस्कृती एकत्र नांदणारा एक समृद्ध प्रदेश
अनेक ऐतिहासिक, भौगोलिक घटकांचा असे हा उन्मेश
कविकल्पित भासो अशा वैविध्यतेने नटलेला माझा भारत देश
जगात शांततेचे पुरस्कर्ते अशी आपली ख्याती
मनात वैर ठेवणाऱ्या शेजारी राष्ट्राशीही जपली नाती
मैत्रिपूर्ण हात सदैव पुढे केला न ठेवता मनात कुठलाही द्वेष
थोरल्या भावाप्रमाणे कठोर परंतु क्षमाशील भूमिका घेणारा माझा भारत देश
आपापल्या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींनी वाढवली देशाची शान
"प्रगतीबरोबर सर्वांगीण विकास" या आपल्या पद्धतीचा आम्हा अभिमान