तु
तु आणि मी
धुंद डोळ्यातल तुझ्या हा भाव
उलगडतो माझ्या स्वप्नांचा गाव
गावात या.. तु आणि मी
हातात तु घेता हात
विरघळतात सारे शब्दभाव....
अश्याच एका कातरवेळी
तुला बिलगावे अन हळुहळु भावना पाझरव्यात
माझ्या मुक शब्दांचा मांडावा
एक सैरभैर डाव.....
या गावच्या वेशीवर घर तुझे
अन माझे न अस्तित्व काही
निव्वळ त्या धुंद चंद्राच्या
साक्षीची ठेव.....
तु ..तुझ्या मनातुन अन मी माझ्या
त्याला साक्ष ठेवत आहे...
या स्वप्नांपलीकडेही
इतरही धागे जुळलेले आहेत...
कशी ठेऊ त्यांना मागे
कसे हे तोडु धागे,
येऊ या स्वप्नांच्या मागे?
पण लक्षात ठेव ... या सप्तरंगी धाग्यातला
तू होतिस तेन्व्हा
एक पसाभर 'तू'
सोनेरी कणांचा भार..
माझ्या मिटल्या पापण्यांवर..
किलकिलत्या डोळ्यांत
दिसलास फक्त तू..
मग तोच खुळा प्रयत्न..
तुला एक स्पर्श करण्याचा..
तुझ्या एक स्पर्शानं
सोनं होण्याचा..
तुझाही तोच खेळ
माझ्याशी..
माझ्या वेड्या मनाशी..
तुझ्या अभासांपाठी धावणारी मी..
अन मला बघून हसणारी तुझी सावली..
बेचैन होणं ही नेहमीचंच माझं..
आज मात्र थांबले क्षणभर..
वेडावणाऱ्या तुझ्या सावलीकडेच उत्तर मागितलं मी..
अन बघता बघता उमगलं,
माझ्या झोळीत मावणारा नाहीचेस तू..
मग तुझ्या त्या सोनसळी कणांना
एक एक करत वेचायचा
पुन्हा एक जीवघेणा खेळ..
ध्यास एकच..
एक पसाभर 'तू' मिळावास
मनभर व्यापून राहिलेलास..