कथा

" कल्पतरु " भाग - १

Submitted by yogitasawant on 7 July, 2009 - 03:18

" स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" अस म्हटलं जात हे अगदी त्रिवार सत्य आहे. " आई" शिवाय जीवन म्हणजे " आत्म्या शिवाय शरीरा" प्रमाणे आहे. जीवनाला महत्त्व प्राप्त होते ते फ़क्त आईमुळेच . कारण तीच मुलाला नऊ महीने आपल्या पोटात वाढवते.

गुलमोहर: 

एक नात्यातल नातं

Submitted by आनंद राजगोळे on 3 July, 2009 - 05:43

आबा, रोजचं व्हराड्यातील पाळण्यावर झोके घेत. आज संध्याकाळी बागेत जायची वेळ झाली तरी झोपाळ्यावर. डोळे झाकून, मंद झोके घेतचं होते. न राहून मी विचारलं.
आबा, कसल्या विचारात आहात? बागेत जायचं न?
आबा, भानावर येत.
हो रे! बाळा, पण आज मन होत नाही आहे बागेत जायला.
मी आश्चर्य चकीत झालो.
का? आज अचानक दांडी फिरायला जायची. अहो! रोज भेटणारे मित्र काय म्हणतील?
आबा हसतचं. अरे, तेच तर झाल आहे. सोबतीला कुणी नसेल तर फिरायला कंठाळा येतो. कुराडे त्याच्या मुलाकडे गेला आहे. मग माझ्या बरोबर कोण फिरणार? म्हणून इच्छा होत नाही आहे.

गुलमोहर: 

जाब!

Submitted by जो on 2 July, 2009 - 08:45

जीवा पुन्हा धाडधाड करत घराबाहेर निघुन गेला. त्याची आई मात्र एका खुर्चीवर बसुन राहिली.हे त्याचे नेहमीचेच होते. स्वतः वरच राग करायचा, आदळापट करायची, आणि बाहेर निघुन जायचे. आई मात्र काहिही बोलत नसे. तो बोलत असला की तशीच बसुन राही.

गुलमोहर: 

मृगजळ - (अंतिम)

Submitted by प्राजु on 1 July, 2009 - 10:54

मृगजळ - १
मृगजळ - २

माय.. ए माय! उठ गं.. थोडं जेवून घे. आज रात्रिच हे वाळवंटातलं जगणं संपणार आहे.. बघ तू. हितनं लांब जायचंय आपल्याला. खूप लांब." ताट वाढता वाढता ती बोलत होती..

गुलमोहर: 

आयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्याचा-- शेवट.

Submitted by भानस on 29 June, 2009 - 01:04

नीताचे लग्न झाले. नवरा, त्याच्या घरचे सगळे चांगले होते. निनाद मनात आयुष्यभर जिवंत राहणारच होता. त्याला बरोबर घेऊनच नीताने संसार-नवऱ्यावर लक्ष केंद्रित केले. पाहता पाहता तीन वर्षे लग्नाला झाली. नीताला दिवस राहिले.

गुलमोहर: 

आयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्याचा-- मध्य

Submitted by भानस on 29 June, 2009 - 00:56

निनाद दुखावला गेला. इतके वैतागण्यासारखे काय केलेय मी हेच त्याला समजेना. कोण समजते स्वतःला. जाऊ दे ना..... मी तरी कशाला केअर करतोय इतकी. पण तिचे डोळे तर काहीतरी वेगळेच सांगत होते. ह्या पोरींच्या मनात काय आहे हे देवालाही कळणे कठीण आहे.

गुलमोहर: 

आयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्याचा

Submitted by भानस on 29 June, 2009 - 00:50

लायब्ररीमध्ये आजकाल फारच गर्दी होऊ लागलेली. वर्षभर उनाडणारी पोरेही पुस्तकात डोके घालून बसली होती. बारावीची परीक्षा अगदी दोन महिन्यावर आलेली. जोतो जीव आय मीन वर्ष वाचवायच्या खटपटीला लागलेला.

गुलमोहर: 

चान्स!!!

Submitted by sas on 28 June, 2009 - 12:01

सकाळी जाग आली तस डोक जड जाणवत होत, डोक्यावरुन हात फीरवत आणी बोटांनी डोक दाबत मानसीने डोळे उघडले, क्षणार्धात आपण कुठे आहोत ह्या धक्क्याने ती पुरती जागी झाली. आपण इथे कसे ह्या विचारात असतांना तीची नजर बाजुला गेली आणी ती ढासळली....

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा