तिच्याकडे पाहून तो हसला.. पण ते सूक्ष्म हसणेही तिच्या नजरेतून सुटले नाही..सुखावली ती..
"काय वं धनी..अस का बघता माज्याकडं "
"हिरॉइन दिसतीय ..अक्षी शबाना आझमी वानी "
" ऑ !! शबाना आझमी..ते वं का ? ऐशर्या का नाय ?"
दीर्घ उसासा घेत, चपलात पाय सरकवत तो काहीतरी करवादला..बाहेर पडतानाचे ते वाक्य तिला ऐकू आले .." आपल्यासारक्याला परडाय नग ?"
स्वप्नं देखील मोजून मापून पाहण्याची सवयच जडली होती गावाला. गेल्या महिन्यात हाहा:कार उडाला होता. उभं पीक पाण्यावाचून गेलं होतं..सावकाराचा तगादा सुरू झाला होता...जमीन नावावर करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
"बाबा, बाबा... आज येताना बाहुली आणणार ना? नक्की? "
"हो नक्की!" तिचा पापा घेत अविनाश म्हणाला.
"बघा ह, कालच्या सारख विसरायचं नाही हं.. नाही तर मग कट्टी फु... " गाल फुगवत लता म्हणाली..
"हो गं माझी बछडी, नक्की ! आता जाऊ दे बाबांना.. उशीर होतोय "
म्हणत तो कामावर जायला निघाला.
"खेळणी आणली की चार दिवसात मोडुन टाकायची.. काही नसते हट्ट पुरवायला नकोत कार्टीचे. इथे महिन्याची १ तारिख गाठायची मारामार.... " डबा अविनाशला देत कविता बडबडत होती.
"जाऊ दे गं! एकुलती एक तर पोर आपली. या महिन्यात देऊ थोडी पोटाला चिमटी. आपण नाहीतर कोण तिची हौस भागवणार?"
म्हाळसाक्का.. भाग १
"मावशे, कोन गं तू?" त्याने तिच्याकडे कृतज्ञतेने पहात विचारले..
"मावशी म्हनालास नव्हं.. मंग मावशीच म्यां." बेफिकीरीने ती म्हणाली.
तिचं वागणं बुचकळ्यात टाकणारं आहे असं त्याला वाटून गेलं.
***********
तो तिच्याकडं बघतच राहिला. म्हाळसाक्कानं त्याच्या पुढ्यातला वाडगा उचलला आणि मागे निंबोर्या जवळ असलेल्या मोरीपाशी नेऊन धुऊन आणला आणि पुन्हा कोंडाळात ठेऊन दिला. तो तिच्या भराभर होणार्या हलचालींकडे बघतच राहिला. "म्हातारी जाड असली तरी वीजेसारखी लवतीय.." त्याच्या मनात विचार आला.
---------------------------------------------------दुसरी आई--------------------------------------------------------------------------
``आजी , आम्ही आलो`` सुनित,विनित दोघेही धावतच आजी जवळ गेले. ``अरे या या`` म्हणत आजी दोघांना बिलगली ``कधी आलात रे तुम्ही सर्वजण ?``
``हे काय आत्ताच येतोय`` सुनित म्हणाला.
``आजी ह्या टर्मीनल एक्झाममध्ये मी पहिला आलो तर हा दुसरा - विनित म्हणाला.
``अरे व्वा, म्हणजे आम्हाला दोघांनाही पेढे द्यावे लागतील`` आजी म्हणाली.
``हे बघ आई, तु घरी कधी जाणार आहेस. मला तुला एक बातमी द्यायची आहे. मुद्दामच आधी तुला सांगितली नाही`` मी म्हणालो.
दरवाजाचं लॅच उघडून अरुण आत आला. डिश वॉशरचा आवाज येत होता. म्हणजे वैशाली घरी आलेली असणार. बूट काढून सोफ्यावर बसेपर्यंत वैशाली किचनमधून पाणी घेऊन आली.
" ए वैशू, चहा टाकतेस? डोकं बघ कसं जड जड झालय"
" हो अगोदरच टाकलाय. होईलच इतक्यात, तोपर्यंत फ्रेश होऊन ये"
अरुण उठला अन बाथरूम मध्ये गेला. वैशू किचन मध्ये गेली. अरुण फ्रेश होऊन यॆईस्तोवर वैशू ने गरमागरम चहा आणि त्याच्या आवडीची पारले-जी ची बिस्किटं मांडून ठेवली होती.
"अर्रे व्वा!! कुठे मिळाली ग ही बिस्किटं. येत नव्हती ना आजकाल इंडियन स्टोर मध्ये ?" - अरूण एकदम चार बिस्किटं उचलत म्हणाला
म्हाळसाक्का!!
(डिस्क्लेमर : ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.)
आमच्या सासुबाई
``अभिनंदन मि. काळे, तुमची मिसेस प्रेग्नंट आहे. तसे दोन महिने होऊन गेले आहेत. पण ह्या फार अशक्त दिसतात. तेव्हा वेळच्यावेळी चेकअप करत जा. आणि हे बघा मिसेस काळे मी काही औषध व टॉनिक लिहून देतो ती घेत जा, मनावर कुठलेही दडपण ठेऊ नका, भरपुर खात जा. मि. काळे त्यांना आनंदीत ठेवण्याचे महत्वाचे काम तुमचे आहे``. डॉ. मटकर हसत हसत म्हणाले.
।। श्री ।।
आमचे हे
``आज आपण सर्व जण इथे जमलो आहोत ते माझ्या पत्नीच्या - म्हणजे निर्मलाच्या 25 व्या कादंबरीच्या प्रकाशना निमित्त. हिच्या एवढया कादंब-या ह्या फक्त गेल्या 10 वर्षात लिहून होतील अस खरच कधी वाटल नव्हत. कॉलेजमधली नोकरी - माझ्यासारख्या कटकटया नवरा व मिलिंद सारखा उचापत्या करणारा मुलगा - शिवाय घरकाम ही सर्व कसरत सांभाळत इतक लिखाण करण खरोखरच कौतुकास्पद आहे`` -
माझा नवरा म्हणजे गिरिश गोखले हा माझ म्हणजे स्वताच्या बायकोच कौतुक करत होता, ऐकायला जरा बर वाटत होत.
" येतो गं अशु...." बाहेर पडण्यापुर्वी मी सौ. ला हाक मारली.
" अरे, पण मास्क घातलायस का?" सौ. ने आठवण करुन दिली.
हो ! आजकाल कुठे बाहेर पडायचं झालं तर डोक्यात हेल्मेट घातलेय की नाही यापे़क्षा तिची मी मास्क घातलाय की नाही यावर जास्त नजर असते. कारण सगळ्यांनाच माहीताय. आजकाल जगभर धुडगुस घालणारा ‘स्वाईन फ़्लु’.