--------------------------------------------------------अॅक्सिडेंट--------------------------------------------------
``अं - या - यान - बसा. मी तुम्हा दोघांचीच वाट पहात होतो`` इन्स्पेक्टर गावडे म्हणाले.
``अरे - सावंत - तो फॅन चालु कर आणि दोन ग्लास पाणी आण बघु``.
डॉ. अजिंक्य देवधर व अनुराधा देवधर हे दोघेही आत आले. दोघेही विमनस्कपणे खुर्चीवर बसले. हातानेच डॉ. अजिंक्य यांनी पाणी नको अशी खुण केली.
``मग चहा घेणार कां ? मी ही घेईन - अरे सावंत - तिन चहा सांग बघु``, इन्स्पेक्टर गावडे म्हणाले.
"साला चहा प्यायचा म्हणले की माझ्या अंगावरचे सगळे केस अटेंशनमध्ये उभे राहतात.......!" मी तिसर्या वेळेस हे वाक्य उच्चारले तसे सगळे माझ्याकडे डोळे विस्फारुन पाहायला लागले.
"हे जोशी पण ने, साला एकदम घोचू हाये! चाय काय घाबरायचा गोष्ट हाये काय? जोशी तू पन ने साला काय पन गोष्टी करते, गपचुप कप उचल अँड खाली करुन टाक तुज्या पोटामंदी. स्टॉप युअर ड्रामा नाऊ! समजला....!" म्हातारा पारशी भडकला!
गुरुदक्षिणा
“May I Come In ?”केबिनचे दार हळूच किलकिलत शब्द आले. डॉ. अनिल आता अगदी थकले होते. रात्रिचे ९.३० वाजत आले होते. आज सकाळपासून दोन ऑपरेशन्स झाली होती. परत संध्याकाळी पेशंटची कन्सल्टिंग रुममध्ये ही गर्दी. आता ह्या शेवटच्या पेशंटला तपासून तो निघणार होता.
` Yes - Come In` पेशंटला तपासतांना वळून तो म्हणाला, त्या बरोबर दार उघडून 45च्या आसपासची एक व्यक्ति आत आली.
`ओs s कदम सर ! आपण आणि या वेळी ? अहो या न आत या, तुम्हाला आत यायला परवानगी कशाला हवी सर ! बसा हं`,
--------------------------धक्का-----------------------------------
``हॅलो-हॅलो - आनंद लिमये आहेत का?`` फोनवर मंजुळ आवाज. ``हो - मी आनंदच बोलतोय, आपण कोण ? मी संभ्रमातच विचारल.
``मी`` - मध्ये जरा वेळ काहीच आवाज नाही - ``अहो नांवात काय आहे - मी - अस समजाना - तुमची एक हितचिंतक``.
"वाकडे गावच्या सुजाण नागरिकांनो ऽऽऽऽ... खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!! उद्या दिनांक १ एप्रिल रोजी समस्त वाकडेवासीयांसाठी एक आगळी वेगळी भव्य जत्रा शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आली आहे...ऽऽऽ"
" काय रे, किती वेळ एकटक पाहतोहेस त्या समुद्राकडे ? "
तिच्या या प्रश्नावर त्याने मान न वळवता एक हुंकार भरला.
" आठवते का ग? आपण तास न तास इथे येऊन बसायचो नाही इथे ? तेव्हांपासून हा अस्साच आहे. कसलाही बदल नाही त्याच्यात !"
त्याच्या केसातून हात फिरवत ती म्हणाली " त्याला काय झाले बदलायला?"
तिच्या चेह-यावर हसू विलसत होते " तू मात्र बदललास.. आठवतेय ना..चांदण्या वगैरे आणून द्यायच्या बाता मारायचास "
आता मात्र त्याने मान वळवून तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात रोखून पाहत मिस्किलपणे तो म्हणाला
"अजूनही आवडतात का ग चांदण्या ?"
मंडळी, माझा मित्र म्हणजे अगदी भक्कम लढवय्या आहे. आणि त्याला झुंजण्यासाठी कुठलं न कुठलं निमीत्त सापडतच असतं. ह्या कथेचं शिर्षक तो वारंवार सिद्ध करत आलाय. ऐका आणखी एक घटना त्याच्या बरोबर घडलेली.
खरंतर खालील कथेला ह्या http://www.maayboli.com/node/2966 कथेचा पुढचा भाग नाही म्हणता येणार...पण नवीन लोकं पहीली कथा वर दिलेल्या लिंक वर वाचु शकतील.
**************************************************
राजू हवालदिल झाला होता. अजून आपण नक्की काय करायला हवं, त्याला कळेना. बाबांचे आता काहीच तास उरलेत हे कळल्यावर, त्याने आधी विजूताईशी संपर्कं साधायचा प्रयत्नं केला.
"विजय राव, विजय राव " गड्याने बोंब ठोकली तो सारे धावत बाहेर आले. जमिनी वर पडलेल्या देहाच्या डोक्यातुन, नाका-कानातुन, हातातुन रक्ताच्या धारा वाहत होत्या हा रक्त बंबाळ देह शांत झालाय हे डॉ. ने सांगण्याची गरज नव्हती पण मृत्यु अपघाती असल्याने पोलीस डॉ. सगळ्या कारवाया कराव्या लागल्या.