उन पावसाचा खेळ, विहंगम दॄष्याचा नजारा
मोर नाचतो रे दुर बनांत, फुलवुन पिसारा
सण सण वाहे वारा, विज कडाडे अवचित
जग न्हाऊन निघाले त्या रुपेरी क्षणांत
आले मेघांचे कळप डोंगर माथ्या वरुन
बरसवित जल धारा झर झर सर सर
जल वाहे नागमोडी घेऊनी खडकांचा आसरा
इवल्या ओहळाचा झाला मोठा केवढा पसारा
सॄष्टी बहरुन आली. पाखरे पावसात न्हाली
धरणी च्या अंगावर ही काय जादू झाली
अरुण पाहे डोकावून .त्याला आढावा आला काळा मेघ
आकाशांत उमटली एक विलक्षण इंद्रधनू रेघ
मैफिल बेडकांची पहा हो भरली शेतांत
गाण्यांत त्यांना आता सर्व कीटकांची साथ
१. दूर कुठेततरी हिमालयाच्या पायथ्याशी जंगलांत वसलेला एक छोटेसे आदिवासी गाव . गाव तुरळक वस्तीचे . घनदाट जंगलाने , दर्या खोऱ्यानी घेरलेले .शहरा पासून , लोक वस्ती पासून तुटलेलं. जंगली श्वापदांची शिकार आणि फळे खाऊन निर्वाह चालत असे . जोगिया त्यांचा मुखिया आणि चंपा त्याची बायको . त्यांच्या बरोबर जोगियाची वृद्ध आजी .
असाच येई श्रावणा
मवारली उन्हे कशी क्षणात न्हात हासली
झळाळता मधेच ती कवेत घेत सावली
टपोरल्या कळ्यांवरी सधुंद भृंग पातले
फुलात रंग रंगुनी तिथेच ते विसावले
सुखावतो तनासही मनास मोहि वात हा
विसावुनी मधेच का झुलावितो फुला फुला
दिशादिशातुनी खुळे भरात मेघ धावती
जरा कुठे कड्यावरी खुशाल लोंब लोंबती
हसून दाखवी कला भुलावतो मनामना
कणाकणा फुलावुनी असाच येइ श्रावणा
-----------------------------------------------------
वृत्त: कलिंदनंदिनी
लगावली: लगालगा/लगालगा/लगालगा/लगालगा
आभाळाच्या पटावरी
आहे एक रंगारी
नित्य नवी नक्षी पहा
रोज कैसी चितारी
पूर्वेला रामप्रहरी
ये कुंचला घेऊनी
लाल पिवळा केशरी
छटा त्या नाना परी
सांज होता पश्चिमेला
जांभळा नी गुलाबी
शुभ्र मेघांचे पुंजके
वा लकेरी तयावरी
मेघ बरसता कधी
रंग सात उधळी
निळे नभ हे राती
कृष्णरंगी रंगवी
बरसू दे मज मेघसा
भार हो आठवांचा वसा
क्षणैक ये गे चमकुनी
सौदामिनीशी मदालसा
© निखिल मोडक
ओल्या मातीचा सुगंध आसमंती फैलावला
मृदा-कस्तुरी वासाने मेघराजा शहारला
शहारला मेघराजा आणि वेगे बरसला
एक सुखद गारवा आसमंती पसरला
ओल्याचिंब आषाढाने हो वैशाख झाकला
वृक्ष प्राणीमात्र सारा बदलाने सुखावला
मेघराजा जरी असा सूर्यकिरणास झाकला
सरत्या कृष्णपक्षासंगे आसमंत गारठला
लेकरांची वाटे चिंता देवप्रभू-निसर्गाला
कोवळ्या ऊन्हात लेऊन धाडतसे श्रावणाला
जसा आला हो श्रावण आसमंत सुखावला
ऋतूचक्रानेच धडा सुख-दुःखाचा हो दिला
- रोहन
कृष्ण सावळा तो राधेचा कुठे हरवला तरी
व्याकुळलेली दिसे बावरी फिरते यमुनातीरी
सूर कुठे पाव्याचा घुमतो कान देऊनी उभी
झुळझुळणारा वारा वाहे नादावून ती खुळी
चमकून बघता अाभाळीचा मेघ शामवर्णी
कान्हा कान्हा शब्द विराले निश्चळ ती रमणी
मेघ थबकला माथ्यावरती राधा फुटली ऊरी
अलगद सुटता भान तयाचे बरसे वरचेवरी
चिंब भिजूनिया कृष्णप्रेमिका अंतरात श्रीहरी
जळ यमुनेचे कृतार्थतेने लोळे चरणांवरी