Submitted by पुरंदरे शशांक on 21 August, 2023 - 00:11
असाच येई श्रावणा
मवारली उन्हे कशी क्षणात न्हात हासली
झळाळता मधेच ती कवेत घेत सावली
टपोरल्या कळ्यांवरी सधुंद भृंग पातले
फुलात रंग रंगुनी तिथेच ते विसावले
सुखावतो तनासही मनास मोहि वात हा
विसावुनी मधेच का झुलावितो फुला फुला
दिशादिशातुनी खुळे भरात मेघ धावती
जरा कुठे कड्यावरी खुशाल लोंब लोंबती
हसून दाखवी कला भुलावतो मनामना
कणाकणा फुलावुनी असाच येइ श्रावणा
-----------------------------------------------------
वृत्त: कलिंदनंदिनी
लगावली: लगालगा/लगालगा/लगालगा/लगालगा
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडलीच.... !
आवडलीच.... !
सुंदर! ढगांचे कडवे फार गोड.
सुंदर!
ढगांचे कडवे फार गोड.
सुंदर आहे श्रावणाच वर्णन.
सुंदर आहे श्रावणाच वर्णन.
सुंदर कविता!
सुंदर कविता!
मनभावन सावन...
मनभावन सावन...
आल्हाददायी !
आल्हाददायी !
मवारली म्हणजे काय?
सुरेख..
सुरेख..
सुंदर!
सुंदर!
सुंदर कविता
सुंदर कविता
शशांक. खूप छान. शब्द लालित्य
शशांक. खूप छान. शब्द लालित्य वर्णावे तेवढे कमीच.
नवा श्रावण :
श्रृंगारलेली फुलं की भृंगारलेली
पाचुरलेली झाडं की 'झोका'ळलेली
काळवंडलेली ढगं की निळावलेली
शिळेची सप्तमी की रंगांची नवमी
शिवांगी दूध की नागांची पंचमी
बेलाचे अर्पण की चन्द्रं प्रणतोस्मि
श्रीहरिकोटा की केदारचा नाथ
जुना महादेव की नवा सोमनाथ
वैकुंठ विमान की तृतीय चांद्रयान
सोडूनी द्या जुने जीर्ण
या उघडा नवे पर्ण
स्वागतासी नव श्रावण
………
रेवती छान वाटले. भृंगारलेली
रेवती छान वाटले. भृंगारलेली फुले मस्त!!