उन पावसाचा खेळ, विहंगम दॄष्याचा नजारा
मोर नाचतो रे दुर बनांत, फुलवुन पिसारा
सण सण वाहे वारा, विज कडाडे अवचित
जग न्हाऊन निघाले त्या रुपेरी क्षणांत
आले मेघांचे कळप डोंगर माथ्या वरुन
बरसवित जल धारा झर झर सर सर
जल वाहे नागमोडी घेऊनी खडकांचा आसरा
इवल्या ओहळाचा झाला मोठा केवढा पसारा
सॄष्टी बहरुन आली. पाखरे पावसात न्हाली
धरणी च्या अंगावर ही काय जादू झाली
अरुण पाहे डोकावून .त्याला आढावा आला काळा मेघ
आकाशांत उमटली एक विलक्षण इंद्रधनू रेघ
मैफिल बेडकांची पहा हो भरली शेतांत
गाण्यांत त्यांना आता सर्व कीटकांची साथ
सोहळा!
सृजनाच्या वाटेवरचं
पहिलं पाऊल तिचं
अजाणता पडलेलं
कि दैवाने धाडलेलं
'मासिक धर्म ' म्हणे
धर्म की कर्म?
असंच वाटतं तेव्हा
उराउरी साठवायचं
मग परतवून लावायचं
आमंत्रणच द्यायचं
असह्य वेदनांना
कशाकरता कोणाकरता
कशाची जाण नसते
तरी ती जाणती होते
जाणतेपण लपवतांना
शरीर मनाचा तोल सांभाळतांना
वेगळेपण जपतांना
थकून जाते
पण जन्म मिळालाय स्त्रीचा
मग हे सोसावंच लागतं
उद्या आई होण्यासाठी
हे तर निसर्गाचं दान
नी स्त्रीत्वाचा सन्मान
स्विकारते ती आनंदाने
मला अजून आठवतो तो दिवस. नुकतेच कालिया मर्दन झाले होते. त्यामुळे मी खूष होतो. आम्ही सगळेच बालगोपाल; इतकेच नव्हे तर मैय्या, नंदबाबा आणि सगळेच गोकुळ आनंदात अन काळजीमुक्त होते.
त्या दिवशी सकाळीच सुदामा आणि ५-६ जण आले. आणि मैय्याला विचारू लागले, " आम्ही जाऊ का यमुनातीरी, कान्हाला घेऊन ? " अन मैय्यानेही हसत हसत आम्हाला जाऊ दिले होते.
कॅमेरा पुरूष असतो
कॅमेरा पुरूषी असतो
तो साठवून घेतो सौंदर्य स्वतःत
सौंदर्य... कधी धावतो पाठीपाठी
कधी मनमानी वळवून घेतो
पुढ्यात स्वतःच्या
कधी कधी तर सौंदर्यच
धावत सुटतं... भान हरपून
कॅमेर्यात, एका पुरुषात
चाचपून पहातं
स्वतःचीच प्रतिमा
सदैव देहभान बाळगत जगण्याऐवजीचा
सोपा मार्ग आहे का हा?
कॅमेरा पुरूष असतो
तो उघडं पाडतो
सौंदर्यांचं स्त्रैण्य स्वतःसमोर
आस्वादानंद तर घेतोच
शिवाय साठवून ठेवतो स्मृतीत
वारंवार तुलनेसाठी