लेखन स्पर्धा १- स्त्री असणं म्हणजे- मी मानसी

Submitted by mi manasi on 19 September, 2023 - 14:46

सोहळा!

सृजनाच्या वाटेवरचं
पहिलं पाऊल तिचं
अजाणता पडलेलं
कि दैवाने धाडलेलं
'मासिक धर्म ' म्हणे
धर्म की कर्म?
असंच वाटतं तेव्हा
उराउरी साठवायचं
मग परतवून लावायचं
आमंत्रणच द्यायचं
असह्य वेदनांना
कशाकरता कोणाकरता
कशाची जाण नसते
तरी ती जाणती होते
जाणतेपण लपवतांना
शरीर मनाचा तोल सांभाळतांना
वेगळेपण जपतांना
थकून जाते
पण जन्म मिळालाय स्त्रीचा
मग हे सोसावंच लागतं
उद्या आई होण्यासाठी
हे तर निसर्गाचं दान
नी स्त्रीत्वाचा सन्मान
स्विकारते ती आनंदाने

रजस्वला ऋतुमती
नवी नवी नावं घेते
त्याचा अर्थ कळतो तेव्हा
आतल्या आत फुलुन येते
उद्याची आई ती..
आजपासून भोगते
सृजनाचा अनोखा सोहळा

मी मानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त