Submitted by mi manasi on 19 September, 2023 - 14:46
सोहळा!
सृजनाच्या वाटेवरचं
पहिलं पाऊल तिचं
अजाणता पडलेलं
कि दैवाने धाडलेलं
'मासिक धर्म ' म्हणे
धर्म की कर्म?
असंच वाटतं तेव्हा
उराउरी साठवायचं
मग परतवून लावायचं
आमंत्रणच द्यायचं
असह्य वेदनांना
कशाकरता कोणाकरता
कशाची जाण नसते
तरी ती जाणती होते
जाणतेपण लपवतांना
शरीर मनाचा तोल सांभाळतांना
वेगळेपण जपतांना
थकून जाते
पण जन्म मिळालाय स्त्रीचा
मग हे सोसावंच लागतं
उद्या आई होण्यासाठी
हे तर निसर्गाचं दान
नी स्त्रीत्वाचा सन्मान
स्विकारते ती आनंदाने
रजस्वला ऋतुमती
नवी नवी नावं घेते
त्याचा अर्थ कळतो तेव्हा
आतल्या आत फुलुन येते
उद्याची आई ती..
आजपासून भोगते
सृजनाचा अनोखा सोहळा
मी मानसी
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली.
आवडली.
आवडली
आवडली
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
सगळ्यांचे मनापासून आभार!
सगळ्यांचे मनापासून आभार!
नाजूक विषय. हळूवार मांडणी.
नाजूक विषय. हळूवार मांडणी. संवेदनशील लिखाण. आवडले.
@अतुल आभारी आहे.
@अतुल
आभारी आहे.
सुरेख.
सुरेख.
सुंदर
सुंदर
सुंदर लिहिलयं.. आवडलं..!
सुंदर लिहिलयं..
आवडलं..!