पुरूषी

कॅमेरा

Submitted by ग्रामिण मुम्बईकर on 30 December, 2011 - 09:56

कॅमेरा पुरूष असतो
कॅमेरा पुरूषी असतो

तो साठवून घेतो सौंदर्य स्वतःत
सौंदर्य... कधी धावतो पाठीपाठी
कधी मनमानी वळवून घेतो
पुढ्यात स्वतःच्या

कधी कधी तर सौंदर्यच
धावत सुटतं... भान हरपून
कॅमेर्‍यात, एका पुरुषात
चाचपून पहातं
स्वतःचीच प्रतिमा
सदैव देहभान बाळगत जगण्याऐवजीचा
सोपा मार्ग आहे का हा?

कॅमेरा पुरूष असतो
तो उघडं पाडतो
सौंदर्यांचं स्त्रैण्य स्वतःसमोर
आस्वादानंद तर घेतोच
शिवाय साठवून ठेवतो स्मृतीत
वारंवार तुलनेसाठी

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पुरूषी