व्हायरस

आणि एका व्हायरसने मुंबई थांबवली....

Submitted by मुक्ता.... on 3 April, 2020 - 15:16

आणि एका व्हायरसने मुंबई थांबवली....

पायांना सवय नव्हती...थांबण्याची..
हातांना सवय होती...स्वतःला सावरण्याची...
आरश्यात स्वतःला फॉर्मलिटी म्हणून पहायचं...
बायकोने नवऱ्याशी आणि नवऱ्याने बायकोशी...
सकाळच्या प्रहरी....फॉर्मलिटी म्हणून हसायचं...
बूट चपला अडकवत तिडकवत...
रोजच स्वतःला झोकून द्यायचं...
जिवंत हाडा मांसाच्या महापुरात....
कसायाच्या दुकानात लटकवलेल्या निष्प्राण सोललेल्या प्राण्यासारखी...
माणसं लटकलेली ट्रेन च्या दरवाज्याला...म्हणे जगण्यासाठी....!

शब्दखुणा: 

"वायसी" व्हायरसची माहिती आणि लक्षणे

Submitted by मानव पृथ्वीकर on 5 March, 2020 - 00:26

सर्वात जास्त संसर्गजन्य, अत्यंत वेगाने पसरणारा आणि सर्वाधिक लागण होणारा व्हायरस म्हणजे वायसी व्हायरस होय.

(वायसी ही अद्याक्षरे नक्की काय दर्शवितात याची आम्हास माहिती नाही, तरी ती येडछाप शब्दावरून घेतली आहेत असे ऐकण्यात आले आहे, खखोदेजा.)

स्वाइन फ्लू असो की इबोला असो की करोना, त्यासोबतच हा वायसी व्हायरस त्याच्या लक्षपटीने पसरून लागण करतो.
या व्हायरसचा मृत्युदर नगण्य असला तरी उपद्रवमूल्य दखल घेण्याइतपत गंभीर आहे. या व्हायरसवर अद्याप कुठला इलाज नाही. याची तीव्रता येत्या दशकात वाढत जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडुन समजते.

याची लक्षणे:

विषय: 

अँड्राईडसाठी अँटिव्हायरस?

Submitted by मानव पृथ्वीकर on 8 June, 2017 - 03:30

अँड्रॉईड मोबाईल फोनवर व्हायरस / मालवेअर आहे बहुतेक. सारखे प्ले स्टोअर मधुन कुठल्याही अ‍ॅपचे पॉप अप येते, सब्स्क्राईब , कॅन्सल ऑप्शन देऊन आणि कॅन्सलवर क्लिक केले तरी कधी थँक यू फॉर सबस्क्रिपशन मेसेज येतो, अ‍ॅप डाउनलोड होते.
तसेच एअरटेलच्या काही व्हॅल्यु अ‍ॅडेड पॅक्सचे ऑटोमॅटिक सबस्क्रिप्शन सुरु होते. एअरटेल चा एस एम एस येतो अमुक पॅक @ Rs 90/- सुरु झालाय, थांबवायचा असाला तर एस एम एस पाठवा म्हणुन.

क्वीक हील मधल्या अलाऊड साईट्स डिसअलाऊ करणे

Submitted by पियू on 31 May, 2016 - 03:59

सैराटमधल्या 'पप्पा तिरु तिरु' रिंगटोनचं कौतुक वाचून मी त्या रिंगटोनसाठी गुगल केलं आणि पहिली साईट आली तिच्यावर क्लीक केलं. तर एक पॉर्न साईट उघडली. मी ती बंद केली आणि दुसरी उघडली तर तिथेही तेच..तिसर्‍या साईटवरही तेच.

Subscribe to RSS - व्हायरस