Submitted by मानव पृथ्वीकर on 8 June, 2017 - 03:30
अँड्रॉईड मोबाईल फोनवर व्हायरस / मालवेअर आहे बहुतेक. सारखे प्ले स्टोअर मधुन कुठल्याही अॅपचे पॉप अप येते, सब्स्क्राईब , कॅन्सल ऑप्शन देऊन आणि कॅन्सलवर क्लिक केले तरी कधी थँक यू फॉर सबस्क्रिपशन मेसेज येतो, अॅप डाउनलोड होते.
तसेच एअरटेलच्या काही व्हॅल्यु अॅडेड पॅक्सचे ऑटोमॅटिक सबस्क्रिप्शन सुरु होते. एअरटेल चा एस एम एस येतो अमुक पॅक @ Rs 90/- सुरु झालाय, थांबवायचा असाला तर एस एम एस पाठवा म्हणुन.
यासाठी मोबाईल फोनवर अँटी व्हायरस टाकण्याचा विचार केला. गुगलवरती फ्री पासून ते ६०० रुपयां पर्यंतचे खूप सारे ऑप्शन्स दिसतात.
कुठला घ्यावा, रिलायेबल कोणता, काय काय फिचर्स घ्यावे / टाळावे या माहिती करिता हा धागा काढत आहे.
जाणकारांनी कृपया माहिती द्यावी, वापरणार्यांनी कृपया आपला अनुभव सांगावा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमच्या मोबाईल मधे कोण कोणते
तुमच्या मोबाईल मधे कोण कोणते अॅप्लिकेशन आहे त्याचे स्क्रिनशॉट घेऊन इथे द्या.
बहुदा मेकओव्हर, गेम्स चे काही अॅप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड केलेले दिसत आहे त्याच्यामुळे हा प्रोब्लेम येतोय.
तुम्हाला मोबाईल फॉरमॅट मारावा लागणार हे निश्चित आहे. त्याशिवाय हे पॉपअप्स निघून जाणार नाही.
क्विक हील
क्विक हील
क्विकहील चांगला आहे पण जेव्हा
क्विकहील चांगला आहे पण जेव्हा मोबाईल मधे ऑलरेडी मेलवेअर असेल तेव्हा तो उपयोगाचा नाही. मेलवेअर काढून मग अॅटीव्हायरस टाकावा. तरी अॅप्लिकेशन डाऊनलोड न बघता केले तर क्विक हिल सुध्दा काही करु शकणार नाही कारण तेव्हा ते अॅप्लिकेशन ला तुम्ही परमिशन दिलेली असते
गजोधर ओके, बायकोचा फोन आहे
गजोधर ओके, बायकोचा फोन आहे तो, रात्री अॅप्सचे स्क्रीन शॉट्स टाकतो.
फॉर्मॅट मारावा लागला तरी सुद्धा त्यात अँटीव्हायरस टाकावाच म्हणतोय. तेव्हा अँटीव्हायरसची माहितीपण द्या.
१)तुमच्या सर्विस प्रवाइडरकडून
१)तुमच्या सर्विस प्रवाइडरकडून हे चालू झालेले पैसेखाऊ पॅापप प्लान्स क्यान्सल करून घ्या.
२)DND चालू करा. सर्व जाहिराती बंद होतात. बँकेचे मेसिजिस बंद होत नाहीत.
START 0
हा मेसिज 1909 या नंबरला पाठवा.
कुठलेही अॅप्लिकेशन ज्यात ते
कुठलेही अॅप्लिकेशन ज्यात ते ओपन करायला मधे अॅड्व्हटाईसमेंट येतात ते अॅप्लिकेशन टाकले असेल तर ते काढून टाका.
मी माझ्या अॅन्ड्रॉईडला
मी माझ्या अॅन्ड्रॉईडला गिझ्मो क्न्ट्रोल + अॅन्टी व्हायरस टाकला आहे. छान आहे.
प्रतिसादा बद्दल सगळ्यांना
प्रतिसादा बद्दल सगळ्यांना धन्यवाद.
विनिता.झक्कासः गिझ्मो कंट्रोलचे वर्षाचे सब्स्क्रिप्शन किती?
साधारण रु ८००/-
साधारण रु ८००/-
अँड्रॉइड मोबाईलला
अँड्रॉइड मोबाईलला अँटीव्हायरसची गरज नाही. आपण चुकीचे अॅप्लीकेशन्स टाकतो आणि मग मनस्ताप होतो.
जाहिराती आणि काय काय सोसावे लागतं. आता मोबाईल अॅपचं फ्री व्हर्जन असलं की ते आपल्याला प्रो व्हर्जनसाठी पुढे ढकलत असतात, ते अॅप किती उपयोगाचं आहे, हे पाहूनच इन्स्टॉल करावं असं वाटतं.
मी सॅमसंग जे७ २०१५ हे मॉडेल वारतो. गेली दीड वर्ष मी मोबाईल वापरुन वापरुन चोथा केला असेल. कष्टम रोक टाकणे आणि थर्ट पार्टी अॅप टाकली आहेत, एकच निष्कर्ष अॅपसोबत येणारे पॉपप अॅप टाकू नका. टाकलं असेल तर काढून टाका.
-दिलीप बिरुटे
फोन फॅक्टसी रिसेट केला आणि
फोन फॅक्टरी रिसेट केला आणि Kaspersky Internet Security install केले. Premium version सब्स्क्रिप्शन रु. १४९/- प्रतिवर्ष.
तेव्हा पासून चांगला पळतोय.
दरम्यान malware ने ३०० रुपयांचा चुना लावला होता हे आता एअरटेल बिल आल्यावर लक्षात आले.
https://adguard.com/en
https://adguard.com/en/welcome.html
हे अँप्लिकेशन टाका. सगळ्या ऍड block करते.